नाशिक

‘बाप्पा डॉट ओआरजी’द्वारे महाराष्ट्राचा गणेशोत्सव जागतिक पटलावर

CD
गणेशोत्सव परंपरांचे होणार डिजिटल दस्तऐवजीकरण शशांक काळे यांची नोडल अधिकारीपदी नियुक्ती सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १४ : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला युनेस्कोचा अमूर्त जागतिक सांस्कृतिक वारसा दर्जा मिळवून देण्यासाठी आणि गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून, या माध्यमातून कला, संस्कृती, ज्ञान, परंपरा आणि उद्योजकतेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयामार्फत विकसित केलेल्या या पोर्टलद्वारे महाराष्ट्रासह देशभरातील तसेच जगातील ३५ हून अधिक शहरांमधील नागरिकांना आपल्या घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, कौटुंबिक विधी, ऐतिहासिक आठवणी, पारंपरिक खाद्यसंस्कृती आदींची माहिती व्हॉट्सअ‍ॅप व ऑनलाइन माध्यमातून नोंदविता येणार आहे. गणेशोत्सवाच्या या बहुआयामी सांस्कृतिक परंपरेत मूर्तीकार, लोककलावंत तसेच विविध पारंपरिक कलांशी संबंधित कारागिरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या कलापरंपरांचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करून त्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे तसेच महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाला गती देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. या डिजिटल अभियानात सहभागी होऊन आपल्या घरातील किंवा परिसरातील गणेशोत्सवाची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनातर्फे ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या परंपरा जतन करण्यासोबतच नागरिकांचा या सांस्कृतिक लोकचळवळीत सक्रिय सहभाग वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : गणरायाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपुरात पोलिसांची कारवाई; डीजेचे साहित्य जप्त

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT