NSK26H29675 : हेमांगी महाजन व चिमुरडा शौर्य.
-------------------
चिमुरड्यासह आईने घेतला गळफास
---
पती सैन्यात तैनात; आत्महत्येचे कारण अस्पष्ट, कुटुंबीयांसह परिसरावर ‘विघ्न’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : घरांसह कॉलन्यांत सार्वजनिक मंडळांतील गणपती स्थापनेची तयारी सुरू असताना, हेमांगी निखिल महाजन (वय ३०, रा. तळेले कॉलनी, दशरथनगर, जळगाव) यांनी मुलगा शौर्य (वय ५) याच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. हेमांगी महाजन यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहेत. हेमांगी महाजन मुलगा शौर्यसोबत शहरातील जुना खेडी रोडवरील का. ऊ. कोल्हे विद्यालयामागे असलेल्या तळेले कॉलनीत सासरच्या मंडळींसोबत राहत होत्या. मुलगा शौर्य इंग्रजी माध्यमच्या शाळेत जायचा. तळेले कॉलनीतील मुख्य रस्त्यावरच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचा अध्यक्ष हेमांगी यांचे दीर अक्षय महाजन आहेत. सोमवारी कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंडळात गणपती स्थापनेची महाजन यांच्या कुटुंबीयांसह कॉलनीत सर्वत्र तयारी सुरू होती. सर्वांना घरातल्या गणेश स्थापनेसह मंडळाच्या आरतीला जायचे असल्याने कुटुंबीयांनी हेमांगी यांना आवाज दिला. मात्र, खोलीतून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून पाहिल्यावर हेमांगी यांनी खोलीत जाऊन एकुलत्या मुलासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. माहिती मिळताच शनिपेठचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल व सहकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून विवाहिता व मुलाचे प्रेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले.
शौर्य, आत्ता खेळत होता
विवाहितेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. हरतालिकेच्या दिवशी विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याने कॉलनीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला. नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. रहिवाशांची कॉलनीसह रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.
माहेरीही धक्का
हेमांगी यांचे माहेर बांभोरीचे. त्यांच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्यात आता या घटनेने विवाहितेच्या आईला मोठा मानसीक धक्का सोसावा लागणार असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.