नाशिक

आईच्या आरोग्यासाठी ज्योर्तिलिंग धावला

CD
फोटो आहे... आईच्या आरोग्यासाठी धावतोय १२ ज्योतिर्लिंगांकडे! पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण करून बिहारचा मोनू त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : आईचे उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनात नवस धरला... आणि त्या संकल्पाला पावलांची साथ देत बिहारचा मोनू धावत निघाला. एक-दोन नव्हे, तर देशातील १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन धावत पूर्ण करण्याचा त्याचा निर्धार आहे. अंगातला थकवा झटकत, मैलोन्‌मैलांचा रस्ता तुडवत त्याने आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक प्रवास पूर्ण केला असून, पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शनही घेतले आहे. आता त्याच्या या धावत्या यात्रेने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा पुढचा टप्पा सोमवारी मोनूने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गाठला. त्याचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्रद्धेने सुरू केलेल्या या धावत्या प्रवासामागची कहाणी ऐकून उपस्थितही भारावून गेले.यानंतर मोनूने सपकाळ नॉलेज हब येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशभरातील विद्यार्थ्यांसमोरील विविध प्रश्न, स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्याने मनमोकळा संवाद साधला. ‘ध्येय मोठे असेल तर वाट कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि सातत्य सोडू नका,’ असा संदेश त्याने विद्यार्थ्यांना दिला. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग, कैलास मोरे आणि योगेश महाले यांनी मोनूचे स्वागत करून त्याच्या संकल्पाला शुभेच्छा दिल्या. मोनूची ही यात्रा केवळ एका धार्मिक संकल्पाची पूर्तता करण्यासाठीची धाव नाही. आईच्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना, श्रद्धेची ताकद, ध्येयाप्रती असलेली जिद्द आणि शरीराची कमाल क्षमता यांचा हा अनोखा संगम आहे. हजारो किलोमीटरच्या या वाटचालीत प्रत्येक पाऊल त्याच्या आईसाठी आहे आणि प्रत्येक मैल त्याच्या संकल्पाला बळ देणारा आहे. त्यामुळेच मोनूची ही ‘धावती यात्रा’ देशभरातील तरुणांसाठी प्रेरणेचा नवा अध्याय ठरत आहे. चौकट महाराष्ट्रात चर्चेत! आईच्या उत्तम आरोग्यासाठी नवस करत १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा धावत पूर्ण करण्याचा संकल्प घेतलेला बिहारचा मोनू सध्या महाराष्ट्रात विशेष चर्चेत आहे. आतापर्यंत ८ हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापत त्याने पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन पूर्ण केले आहे. श्रद्धेच्या जोरावर सुरू असलेली त्याची ही धावती यात्रा आता त्र्यंबकेश्वरमार्गे पुढे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT