नाशिक

सायबर भामट्यांनी दोघांना घातला ९५ लाखांना गंडा

CD
सायबर भामट्यांकडून दोघांना ९५ लाखांचा गंडा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : शेअर बाजारात अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे तसेच बनावट मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाइन ट्रेडिंग करण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील दोघांना ९४ लाख ६७ हजार २३ रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे पुढील तपास करत आहेत. पहिली घटना ३ ऑगस्ट ते १९ ऑगस्टदरम्यान घडली. सायबर भामट्यांनी तसेच विविध बँक खातेदारांनी फिर्यादीशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. ऑनलाइन ट्रेडिंगचा बनाव रचून संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ४० लाख १६ हजार २३ रुपये भरण्यास भाग पाडले. रक्कम भरल्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि मूळ रक्कमही परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. दुसऱ्या घटनेत, ४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्क साधून सायबर भामट्यांनी एका नागरिकाला जाळ्यात ओढले. स्वतःला शेअर मार्केट ब्रोकर असल्याचे भासवत संशयितांनी ''एनएएमएचसीके'' नावाच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे ट्रेडिंग केल्यास मोठा नफा होईल, असे पटवून दिले. फिर्यादीने विश्वासाने वेळोवेळी विविध खात्यांवर ५४ लाख ५१ हजार रुपये ट्रान्स्फर केले. मात्र, नफा तर दूरच पण गुंतवलेले पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणांत नागरिकांची एकूण ९४ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. --कोट अनधिकृत अ‍ॅप्स, व्हॉट्सअ‍ॅप किंवा टेलिग्राम ग्रुपद्वारे शेअर बाजारात अवाजवी परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित ब्रोकर किंवा संस्था सेबी नोंदणीकृत आहे का, याची शहानिशा करा, सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. - सुशीला कोल्हे, वरिष्ठ निरीक्षक, शहर सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

Moshi Waste Depot: नऊ कामगारांचा बळी, दोन महिन्यांनंतरही दोषी कोण?; मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

तुळस पवित्र असूनही गणपतीला का वाहत नाहीत? 'या' पौराणिक कथेत दडलंय कारण

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

SCROLL FOR NEXT