नाशिक

उन्‍हाचा चटका वाढला

CD
दोन दिवसांच्‍या पावसानंतर उन्‍हाचा चटका ------ उकाड्यातही वाढ; जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस नाही सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्‍यानंतर सोमवारी(ता.१४) सकाळपासूनच सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने कडक उन्हाचा चटका जाणवू लागला. मंगळवारीदेखील हीच परिस्थिती असून भाद्रपद महिन्‍यातील उन्‍हाचा चटका आता जाणवू लागला आहे. अधूनमधून काही काळ ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेल्याने उकाडाही निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी अर्थात शनिवार व रविवारी जिल्ह्यातील विविध भागांत पाऊस झाला. काही भागांत जोरदार पाऊस झाल्‍यानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे दोन दिवसांपासून थंडावा जाणवत होता. याशिवाय शेतशिवारातही ओलावा निर्माण झाला. खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पावसानंतर लगेचच उन्हाची तीव्रता वाढली. दोन दिवसांपासून तापमान वाढले असून, ३२ अंशांवर तापमान पोहोचले आहे. अजूनही पावसाची गरज गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात सातत्याने बदल होत आहेत. साधारण महिनाभर पावसाने दडी मारल्‍याने शुक्रवारी (ता.११) पावसाचे आगमन झाले. सलग दोन दिवस दमदार पाऊस झाला. त्यानंतर पुन्‍हा पाऊस गायब झाला आहे. दरम्‍यान, काही वेळ ढगाळ वातावरण, त्यानंतर पाऊस व पुन्हा कडक ऊन असे वातावरण सध्‍या अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे आकाशात ढगांची गर्दी होत असली तरी पाऊस येत नसल्याचे चित्र आहे. दरम्‍यान, अजूनही पावसाची आवश्‍यकता असल्‍याने शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे आहे. आर्द्रतेत वाढ दोन दिवसांच्या पावसानंतर वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यातच मंगळवारी (ता.१५) सकाळपासून उन्हाचा चटका अधिक प्रमाणात जाणवू लागल्याने उकाड्यात वाढ झाली. दुपारी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत होती. तापमानात वाढ झाल्‍याने उकाड्यातदेखील प्रचंड वाढ झाली. रात्रीचा उकाडाही वाढल्याने अस्‍वस्‍थता जाणवू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT