धुळे : टुडे पान ४ साठी...
--
फोटो क्रमांक : 29699
मुंबई : हिंदी दिवस व सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनानिमित्त उभारण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’च्या स्टॉलवर करण्यात आलेली विविध नैसर्गिक व आदिवासी उत्पादनांची मांडणी.
--
मुंबईतील हिंदी संमेलनात ‘शबरी नॅचरल्स’चा डंका
--
आदिवासींच्या पारंपरिक उत्पादनांना मुंबईत मिळाले हक्काचे व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. १५ : हिंदी दिवस २०२६ तसेच सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनानिमित्त मुंबईत झालेल्या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘शबरी नॅचरल्स’च्या स्टॉलने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. या स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यभरातील आदिवासी व ग्रामीण भागातील पारंपरिक नैसर्गिक ज्ञानावर आधारित विविध उत्पादनांची माहिती उपस्थितांना मोठ्या प्रमाणावर देण्यात आली.
या संमेलनाला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री नित्यानंद राय, केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार, खासदार नरेश म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात ठेवण्यात आलेल्या ‘शबरी नॅचरल्स’च्या स्टॉलमध्ये नैसर्गिक उत्पादने, प्रक्रिया केलेले पदार्थ, मध, हर्बल उत्पादने, बांबू व नैसर्गिक साहित्यापासून तयार केलेल्या वस्तू, हस्तकला तसेच आदिवासी महिलांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे स्टॉलला भेट देणाऱ्या नागरिकांकडून या उत्पादनांची माहिती जाणून घेण्यासाठी मोठी उत्सुकता दिसून आली.
-
आधुनिक बाजारपेठ
जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील आदिवासी भागातील स्थानिक संसाधनांचा शाश्वत वापर करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, स्थानिक उत्पादक व महिला बचतगटांना प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक ज्ञानाला आधुनिक बाजारपेठेशी जोडणे, या मुख्य उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरात या उत्पादनांचे प्रदर्शन झाल्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील उत्पादकांना व्यापक बाजारपेठेची ओळख होण्यास मदत होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.