नाशिक

निवृत्त कर्मचारी सभा

CD
धुळे : टुडे पान ४ साठी... -- निवृत्त कर्मचाऱ्यांचे संघटन काळाची गरज -- प्रभाकर नेरे : साक्रीत निवृत्त कर्मचारी सभा, कार्यकारणी गठित सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. १५ : निवृत्तीनंतरचे आयुष्य अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सक्रिय ठेवण्यासाठी निवृत्त अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे संघटन काळाची गरज बनले आहे. जास्तीत जास्त निवृत्त कर्मचाऱ्यांनी या संघटनेत सामील व्हावे, असे आवाहन मार्गदर्शक प्रभाकर नेरे यांनी केले. येथील शिवाजीनगर परिसरातील मोरे क्लासेसच्या सभागृहात साक्री तालुका कृतीशिल निवृत्त अधिकारी- कर्मचारी संघटनेची सभा पार पडली, त्याप्रसंगी श्री. नेरे बोलत होते. सभेची सुरुवात करताना शाखाध्यक्ष पी. झेड. कुवर यांनी मागील सभेचा वृत्तांत सादर केला. कृतीशिल निवृत्त अधिकारी- कर्मचारी संस्थेचे आजअखेर २५० पेक्षा अधिक सभासद झाले असून, याचे संपूर्ण श्रेय संस्थेच्या सर्व संचालक मंडळाला जाते, असे त्यांनी नमूद केले. वाढती सभासदसंख्या लक्षात घेता मध्यवर्ती संस्थेने साक्री शाखेला स्वतंत्र बँक खाते उघडण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व संचालकांनी पूर्ण जबाबदारीने संस्थेला अधिक पुढे नेण्याचे काम करावे, असे आवाहन पी. झेड. कुवर यांनी केले. या सभेत संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली. यात अध्यक्षपदी पी. झेड. कुवर, सचिवपदी अशोक देसले, तर कोषाध्यक्षपदी लाला मोरे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विजय भोसले, शरद अहिरराव, विलास देसले, कार्याध्यक्षपदी सुधीर अहिरराव (महसूल), संपर्क प्रमुखपदी डॉ. हंसराज देवरे (पशुवैद्यक), सहसचिवपदी डॉ. दिलीप लोखंडे (पशुवैद्यक), पिंपळनेर उपशाखा प्रमुखपदी ए. बी. मराठे, निजामपूर उपशाखा प्रमुखपदी सुनील शहा, सहकोषाध्यक्षपदी शरद बोरसे (ग्रामसेवक), संघटकपदी दिगंबर नांद्रे, बी. एम. भामरे, सदस्य म्हणून शिवाजी खैरनार, केशव देसले, कैलास काकूस्ते, तुषार सोनवणे, लालजी नांद्रे, अनिल तोरवणे, सुहास सोनवणे, महिला प्रतिनिधी उषा ठाकरे, क्रांती वेंदे आणि मार्गदर्शक म्हणून पी. बी. नेरे व सयाजीराव अहिरराव यांची निवड झाली. कार्यक्रमात उल्लेखनीय योगदानाबद्दल ए. बी. मराठे, सुनील शहा आणि डॉ. दिलीप लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष देसले यांनी सूत्रसंचालन केले. सचिव देसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT