पान-२ साठी
(सकाळ विशेष लोगो वापरावा)
...
भेसळयुक्त मिठाईवर करडी नजर
‘एफडीए’ची जिल्ह्यात १५ पथकांकडून नियमित तपासणी सुरू : ग्राहकांनी बाळगावी सावधगिरी
...
नरेश हाळणोर ः सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : दुधाच्या खव्यापासून पेढा, बर्फी यांसारख्या अनेक मिठाईचे प्रकार बनविले जातात. ऐन सणासुदीत मिठाईला मागणी वाढल्याने बनावट खव्यापासून बनविलेली मिठाई ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची १५ पथके शहर-जिल्ह्यात करडी नजर ठेवून आहेत. ग्राहकांनी असे पदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.
--------------
गणेशोत्सवात प्रसादाच्या निमित्ताने मिठाईला मागणी वाढते, त्यामुळे भेसळखोर संधी साधून भेसळीचे पदार्थ विकतात. सणासुदीला भेसळयुक्त मिठाई बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. दुधाच्या खव्याचे प्रमाण कमी करून त्यात अन्य प्रकारचे पीठ व रासायनिक पदार्थ वापरून भेसळयुक्त मिठाई बाजारात विकली जात आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यापासून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमधून नाशिकला आलेल्या भेसळयुक्त मिठाईप्रकरणी तसेच निफाडमधील कोल्ड स्टोअरेजवर छापा टाकून कारवाई केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल १५ पथके शहर-जिल्ह्यात कार्यरत असून, सातत्याने अन्नपदार्थांची तपासणी केली जात आहे. मोठी हॉटेल्स, उघड्यावरील अन्नपदार्थांची तपासणी करतानाच, मिठाईच्या दुकानातील पदार्थांचीही चाचणी केली जात आहे.
...
२०-२
अशी ओळखा भेसळयुक्त मिठाई
-मिठाई वा खवा तळहातावर घेऊन रगडा. तो जर कोरडा न होता तेलकट वा वास आला तर भेसळ समजावी.
-मिठाईचा तुकडा तोंडात टाकताच, तेलकट वाटला तर त्यात भेसळ समजावी.
-मिठाई वा खव्यावर टिंचर आयोडिनचे दोन थेंब टाका. भेसळ नसल्यास त्यावर काहीही परिणाम होणार नाही. भेसळ असल्यास थेंबाची जागा काळसर होईल.
-मिठाई वा खव्यावर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. मिठाईचा रंग जांभळा झाल्यास त्या मिठाईत मिटॅनील हे रसायन वापरल्याचे सिद्ध होईल.
-भेसळयुक्त मिठाई खाल्ल्यानंतर काही वेळात मळमळ, उलटी व जुलाब सुरू होतात.
-भेसळयुक्त मिठाई शुद्ध खव्यापासून न बनविता, अर्ध्या प्रमाणात खावा, त्यात मैदा वा अन्य पीठ वापरले जाते. त्यात काही रासायनिक पदार्थही वापरले जातात. त्यामुळे त्यात खव्याप्रमाणे चिकटपणा येऊ शकेल. तसेच साखरेचे प्रमाण मात्र बनावट खव्यात बिघडते. त्यामुळे बनावट मिठाई चविष्ट राहत नाही.
....
१६-१
अशी आहेत पथके
सहायक आयुक्त : ४
अन्नसुरक्षा निरीक्षक : १५
...
कोट
भेसळयुक्त मिठाईबाबतची सातत्याने तपासणी करून कारवाई केली जात आहे. शहर-जिल्ह्यात १५ पथके कार्यरत आहेत. वारंवार तपासणी सुरू आहे, तरीही ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना काळजी बाळगावी. तक्रार असल्यास तत्काळ संपर्क साधावा.
-मंगेश माने, सह-आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, नाशिक
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.