नाशिक

महसूल विभागाचा निर्णय

CD
धुळे : टुडे पान २ साठी... मेन -- फोटो क्रमांक : 29705 - एआय इमेज -- नागरिकांच्या भेटीसाठी तीन ते पाचची वेळ निश्चित -- महसूल विभागाचा निर्णय; प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, अडचणी आणि शासकीय कामकाजातील प्रश्नांचे स्थानिक पातळीवरच तत्परतेने निराकरण व्हावे. तसेच, सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी शासनाच्या महसूल विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व महसूल कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज दुपारी तीन ते पाच पर्यंतची वेळ नागरिकांच्या भेटीसाठी सक्तीने राखीव ठेवण्यात आली आहे. - या नव्या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातून आणि शहरातून महसूल कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची होणारी फरफट थांबणार असून, प्रशासनातील लालफितीचा कारभार संपुष्टात येण्यास मदत मिळणार आहे. महसूल प्रशासनातील सर्वोच्च पातळीपासून ते थेट तालुका पातळीपर्यंतच्या सर्व प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांना या वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या नवीन नियमानुसार धुळे जिल्ह्यासह राज्यभरात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार या सर्व प्रमुख पदांवरील अधिकाऱ्यांनी दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत कार्यालयात आवर्जून उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या दोन तासांच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी, विविध निवेदने, तसेच शासकीय योजना व महसूलविषयक कामांसंबंधीच्या अडचणी ऐकून घेणे आणि त्यावर आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करणे अपेक्षीत आहे. प्राप्त अर्जांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना समाधान देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. - सूचना फलक अनिवार्य कार्यालयातील पारदर्शकता अधिक बळकट करण्यासाठी महसूल कार्यालयांमध्ये नागरिकांच्या भेटीची नोंद ठेवण्यासाठी एक मध्यवर्ती ‘अभ्यागत नोंदवही’ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना या राखीव वेळेची अचूक माहिती मिळावी यासाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठळक अक्षरात माहिती दर्शविणारे सूचना फलक लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या वेळी अत्यंत तातडीचे शासकीय काम किंवा वरिष्ठ स्तरावरील आपत्कालीन बैठकीमुळे संबंधित अधिकारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उपलब्ध राहू शकले नाहीत तर त्याबद्दलची पूर्वकल्पना सूचना फलकावर देणे बंधनकारक राहील. तसेच अशा परिस्थितीत नागरिकांचे अर्ज व तक्रारी विनाविलंब स्वीकारण्यासाठी एका सक्षम पर्यायी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी तरतूदही या शासन निर्णयात करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाला अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान बनवण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे पाऊल स्वागतार्ह मानले जात आहे. - १४-१ ..चौकट.. १४-१ राखीव वेळेत बैठका नकोत अनेकदा अधिकारी बैठका किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे नागरिक तासनतास कार्यालयात ताटकळत बसतात हे चित्र आता बदलणार आहे. नागरिकांसाठी राखीव असलेल्या दुपारी तीन ते पाच या वेळेत कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत बैठका, आढावा बैठक किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आयोजित करू नयेत, असा सक्त आदेश शासनाने दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी पूर्णवेळ केवळ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी कार्यालयीन दालनात उपलब्ध राहतील, ज्यामुळे कार्यालयीन कामकाजात शिस्त आणि सुसूत्रता येणार आहे. -

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT