नाशिक

स्वच्छता ही सेवा अभियान

CD
धुळे : टुडे पान २ साठी... अँकर -- धुळ्यात उद्यापासून स्वच्छता ही सेवा अभियान -- स्वच्छतेमध्ये सहभाग; स्वच्छ भारत, विकसित भारत मध्यवर्ती संकल्पना सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ हे व्यापक वार्षिक अभियान राबविण्यात येणार आहे. यावर्षी ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही मध्यवर्ती संकल्पना असून, याद्वारे संपूर्ण स्वच्छता आणि लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील अस्वच्छ आणि वर्दळीची सार्वजनिक ठिकाणे ओळखून त्यांचे नकाशीकरण केले जाईल व निश्चित कालावधीत ती पूर्णपणे स्वच्छ केली जातील. शाळांमध्ये स्वच्छता ज्ञान यात्रा, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी आणि जल संचय संवाद या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाईल. तसेच, कचरा वर्गीकरण मोहीम, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष उपक्रम राबविले जातील. - श्रमदान व स्वच्छता गतवर्षाप्रमाणेच एक ऑक्टोबरला ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या देशव्यापी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात सार्वजनिक श्रमदानाचे आयोजन केले जाणार आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी कचऱ्यातून संपत्ती आणि कचऱ्यातून कलाकृती या नाविन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित विविध उपक्रम राबविले जातील, ज्यामुळे नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती निर्माण होईल. - १४-१ ..चौकट.. १४-१ सफाई मित्र सुरक्षा समाजाचा कणा असलेल्या सफाई कामगारांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला अभियानात प्राधान्य देण्यात आले आहे. त्यांच्यासाठी विशेष एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. तसेच, त्यांना पीपीई किट्स व आवश्यक सुरक्षा साधनांचे वाटप करून स्थानिक पातळीवर त्यांचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, बचत गट, युवक आणि प्रतिष्ठित नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार आणि पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव यांनी केले आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT