नाशिक

सावरिया सेठ, रामेश्वरमच्या प्रतिकृती ठरणार भाविकांचे आकर्षण

CD
मेनफिचर ------ (फोटो ठळक वापरावेत) NSK26H29721 : नेहरु चौक बहुउद्देशीय मित्रमंडळाची आकर्षक मूर्ती. NSK26H29722 : नेहरु चौक बहुउद्देशीय मित्रमंडळाचा देखावा. (हा फोटो मोठा वापरावा) NSK26H29723 : रेल्वेस्थानक रोड जय गणेश मित्रमंडळाची पर्यावरणपूरक मूर्ती. NSK26H29724 : रेल्वेस्थानक रोड जय गणेश मित्रमंडळाचा देखावे. (हा फोटो मोठा वापरावा) ---- ‘रामेश्वरम’, सावरिया सेठ भाविकांचे आकर्षण गणेश मंडळांच्या देखाव्यांना अंतिम स्वरूप; कार्यकर्त्यांची रात्रंदिवस धावपळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता १६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांच्या देखाव्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी कार्यकर्त्यांची रात्रंदिवस लगबग सुरू आहे. आकर्षक रोषणाई, सजावट, धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या आरासांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक लक्षवेधी ठरणार आहे. शहरातील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळ ‘जळगावचा राजा’ आणि जय गणेश मित्र मंडळ, रेल्वेस्थानक रोड यांच्या देखाव्यांकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे. ‘जळगावचा राजा’ श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे. यंदा मंडळातर्फे राजस्थानातील प्रसिद्ध सावरिया सेठ यांच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थानात प्रसिद्ध असलेल्या सावरिया सेठचे दर्शन जळगावातच घेता येणार असल्याने भाविकांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. मंडळाचे अध्यक्ष अजयकुमार गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते देखावा पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. धार्मिक वातावरणाची अनुभूती देणारी सजावट, आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रामेश्वरमची प्रतिकृती रेल्वेस्थानक रस्त्यावरील जय गणेश मित्रमंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने रामेश्वरम येथील धार्मिक स्थळाची प्रतिकृती साकारली आहे. मागील वर्षी मंडळातर्फे चारधामचे देखावे साकारण्यात आले होते. यंदा आरास सादरीकरणाचे चौथे वर्ष असून धार्मिकतेसोबत सामाजिक संदेश देण्यावरही भर देण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष राहुल तोडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी व कार्यकर्ते आरास पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या मंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे केळीच्या खोडापासून साकारण्यात आलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. मंडळाचे कार्यकर्ते विनायक ठाकूर यांनी स्वतः ही मूर्ती साकारली आहे. त्यांना साहिल ठाकूर, तेजस गवळी, ईशा ठाकूर, अल्केश जाखेडे आणि खगेश जाखेडे यांची साथ लाभली आहे. ही गणेशमूर्ती ११ फूट उंचीची असून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मूर्ती साकारण्याचा मंडळाचा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. झुल्यावर विराजमान गणराय यश लॉन परिसरातील गणाधीश फाउंडेशनतर्फे गणेशोत्सवानिमित्त यंदा भव्य व आकर्षक गणेशमूर्ती तसेच विशेष सजावट करण्यात आली आहे. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे झुल्यावर विराजमान गणरायाची मनमोहक मूर्ती आणि सजावटीमध्ये साकारण्यात आलेली नाशिक महाकुंभाची आकर्षक थीम. चौकट महाकुंभाचे ठरतेय आकर्षण गणरायाची सुंदर मूर्ती, आकर्षक सजावट व रोषणाईसोबतच नाशिक महाकुंभाच्या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम साधत तयार करण्यात आलेला हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणरायाच्या दर्शनासोबतच महाकुंभाच्या थीमचा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. झुल्यावर विराजमान गणराय आणि नाशिक महाकुंभाची भव्य थीम हे यंदाच्या गणाधीश फाउंडेशनच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT