फोटो : NSK26H29741
नंदुरबार : जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सजविलेली औषध निर्मितीवर आधारीत आरास.
--------
गणरायाच्या आरासमधून औषधनिर्मितीचा संदेश
जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसीत लक्षवेधी देखावा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : येथील जिजामाता शैक्षणिक संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी येथे श्री गणेश स्थापना उत्साहात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी औषध निर्मितीचा संदेश देणारी आकर्षक आरास सजवली आहे. यातून औषधनिर्मिती ही एक कला, विज्ञान आणि समाजसेवेचे माध्यम असल्याची संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि फार्मसी विषयातील ज्ञानाचा सुरेख मिलाफ साधत औषधनिर्मिती, आयुर्वेद, फार्मास्युटिकल विज्ञान, औषधांचे विविध प्रकार, प्रयोगशाळेतील उपकरणे तसेच आरोग्यसेवेतील फार्मासिस्टची भूमिका यांचे आकर्षक दर्शन घडविले आहे.
गणरायाच्या सभोवताली औषध, कॅप्सूल, रसायनशास्त्र, प्रयोगशाळा, आरोग्यसेवा आणि फार्मसीशी संबंधित प्रतिकात्मक मांडणी करण्यात आली आहे. या संदेशांमधून फार्मासिस्टच्या सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आरासीत आयुर्वेद आणि आधुनिक औषधनिर्मिती विज्ञानाचा सुंदर समन्वय साधण्यात आला आहे. औषधी वनस्पतींपासून आधुनिक प्रयोगशाळेतील औषधनिर्मितीपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने मांडला आहे. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला, कल्पकतेला आणि फार्मसी विषयावरील आत्मीयतेला व्यासपीठ देणारी ही आरास ठरली आहे. आरोग्य, विज्ञान आणि मानवसेवेचा संदेश देणारी ही अनोखी आरास विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांच्या या अभिनव संकल्पनेचे जिजामाता शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्गाने कौतुक केले. श्री गणेशाच्या मंगलमय आगमनासोबत ज्ञान, विज्ञान आणि आरोग्यसेवेचा संदेश प्रत्येकाच्या मनात रुजावा, या भावनेतून विद्यार्थ्यांनी साकारलेली ही आरास गणेशोत्सवाच्या उत्सवाला वैज्ञानिक आणि सामाजिक आयाम देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.