फोटो क्रमांक : 29735
छत्रपती संभाजीनगर : सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना दोंडाईचास्थित हस्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय दुग्गड, प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, सीए एल. बी. जैन, अमित चोपडा आदी.
---
दोंडाईचाच्या हस्ती बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
--
सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचालीस आणखी एक मानाचा तुरा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दोंडाईचास्थित हस्ती बँकेला (मल्टिस्टेट बँक) दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबईतर्फे २०२५-२६ च्या सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक हजार एक कोटी ते अडीच हजार कोटी ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून बँकेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.
छत्रपती संभाजीनगर येथील एक्स्प्रेस इन हेरिटेज रोडमध्ये पुरस्कार वितरण झाले. एनएनएफसीयूबी अध्यक्ष लक्ष्मीदास, फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्ष वैशाली आवाडे, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेतर्फे उपाध्यक्ष संजय दुग्गड, संचालक प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, सीए एल. बी. जैन आणि अमित चोपडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
बँकेच्या २३ शाखा
सध्या ५६ व्या वर्षात असलेल्या हस्ती बँकेने नुकताच एक हजार ३०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. बँकेचा व्यवसाय दोन हजार १०० कोटींच्या पुढे गेला असून, मागील आर्थिक वर्षात बँकेने २४.२७ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेच्या २३ शाखा असून, आधुनिक काळाची गरज ओळखून डिजिटल पेमेंट सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेने सभासदांना गेल्या ३३ वर्षांपासून १५ टक्के लाभांश, तसेच २०२५-२६ मध्ये अतिरिक्त पाच टक्के, असा एकूण २० टक्के डिव्हिडंड अदा केला आहे.
बँक प्रगतिपथावर
बँकेचे संस्थापक हस्तीमल जैन, मार्गदर्शक शांतिलाल जैन आणि आधारस्तंभ कांतिलाल जैन यांनी रुजविलेली विश्वासाची परंपरा व आर्थिक शिस्तीमुळे बँक प्रगतिपथावर आहे. बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मदन जैन, संचालक, सीईओ सतीश जैन आणि बँकिंग तज्ज्ञ प्रकाश कुचेरिया यांच्या मार्गदर्शनात बँक विविध क्षेत्रांत प्रगती करीत आहे. खातेदार, सभासद, ग्राहक, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांमुळे बँकेने हा गौरवशाली टप्पा गाठला आहे. राज्य व राष्ट्रीय पातळीवरील ६३ पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या बँकेच्या वाटचालीत आणखी एका मानाच्या पुरस्काराची भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.