नाशिक

कर्तव्यात कुचराई; तीन अंमलदारांचे निलंबन

CD
बंदोबस्ताला गैरहजर तीन अंमलदारांचे निलंबन ... सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सोमवारी (ता. १४) कडेकोट बंदोबस्त तैनात होता. असे असताना, बंदोबस्ताच्या ठिकाणी नेमणूक केलेली असतानाही गैरहजर राहिल्याची बाब पोलिस आयुक्तांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास आल्याने एक महिला अंमलदारासह तिघांना निलंबित केले आहे. मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी मंगळवारी (ता. १५) निलंबनाचे आदेश जारी केले. सोमवारी (ता. १४) बाजारपेठांसह गणेशमूर्ती विक्री केंद्राच्या परिसराबाहेर पोलिस बंदोबस्त होता. तर, वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक अंमलदारांसह अतिरिक्त कुमकही तैनात होती. दरम्यान, चोपडा लॉन्स रस्त्यावर असलेल्या पॉइंटवर एक महिला अंमलदारासह दोन अंमलदारांची नेमणूक करण्यात आलेली होती. सोमवारी (ता. १४) सायंकाळी गर्दी झाली होती. या वेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी पाहणी केली असता, त्यावेळी एकही अंमलदार उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यात कुचराई केल्याच्या कारणावरून पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये महिला अंमलदारासह दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांच्या या निलंबनाच्या कारवाईने आयुक्तालय हद्दीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. .... निलंबित अंमलदार - अशोक वामन आघाव (शहर मुख्यालय) - तुषार दिलीप मंडलिक (शहर अभियोग कक्ष) - प्रतिभा गणेश गायधनी (शहर मुख्यालय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT