नाशिक

दिंडोरीतील ७ आयुष्मान उपकेंद्रे राज्यस्तरीय मूल्यांकनात पात्र

CD
पान-२ ३०-२ राज्यस्तरीय मूल्यांकनात ७ आयुष्मान उपकेंद्रे पात्र सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन राज्यस्तरीय मूल्यांकनात दिंडोरी तालुक्यातील सात आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रे यशस्वीरीत्या पात्र ठरली आहेत. आरोग्य संस्थांच्या सेवा पुरवठ्याची गुणवत्ता, रुग्णांचे हक्क, पायाभूत सुविधा, समर्थन सेवा, क्लिनिकल सेवा, संसर्ग नियंत्रण आणि गुणवत्ता व्यवस्थापन आदी विविध निकषांवर काटेकोरपणे तपासणी करण्यात आली. या मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्व सात आरोग्य संस्थांनी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक एकत्रित गुण प्राप्त केले. दिंडोरी तालुक्यातील अंबेगण, अहिवंतवाडी, अंबानेर, आंबे दिंडोरी, आंबेवणी, चौसाळे आणि चिंचखेड या सात आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्रांचा यामध्ये समावेश आहे. गर्भवती महिला व बालकांचे आरोग्य, कुटुंब कल्याण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच रुग्णकेंद्री सेवा यामध्ये या संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि जिल्हा गुणवत्ता पथकाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले. --------------- कोट राज्यस्तरीय मूल्यांकनात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत पात्रता प्राप्त करणे ही जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. नागरिकांना त्यांच्या जवळच्या आरोग्य केंद्रावर गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. -ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT