फोटो : H29754
नाशिक : इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (पश्चिम विभाग) च्या ४२ व्या मूत्रपिंड विकार तज्ज्ञ परिषदेप्रसंगी उपस्थित पदाधिकारी, तज्ज्ञ वक्ते.
------------
‘डायलिसीस’ गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती करणार शिफारस
मूत्रपिंड तज्ज्ञांच्या ‘आयएसएनडब्ल्यूझेड २०२६’ परिषदेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गुणवत्तापूर्ण डायलिसीसमुळे रुग्णाला दिलासा मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध डायलिसिस केंद्रांना अद्ययावत करण्यासह इतर विविध सुविधा सुचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. ही समिती शासन, प्रशासनाला शिफारशी करणार असल्याची माहिती मूत्रपिंड विकार तज्ज्ञांच्या परिषदेत दिली.
इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (पश्चिम विभाग) च्या ४२ व्या मूत्रपिंड विकार तज्ज्ञ परिषदेचा (आयएसएनडब्ल्यूझेड २०२६) समारोप रविवारी (ता. १३) झाला. परिषदेच्या या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी तीन विविध सभागृहांमध्ये विविध वैद्यकीय सत्रांचे आयोजन केले होते. ‘३६० डिग्री किडनी केअर’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेच्या शेवटच्या दिवशी देशभरातून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा, संशोधकांचा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिले मुख्य सत्र हॉटेल ट्रिट येथील डॉ. विद्या आचार्य सभागृहात पार पडले. कन्सल्टंट ओरल प्रेझेंटेशनचे परीक्षण डॉ. देवदत्त चाफेकर व डॉ. एन. के. हसे यांनी केले. मानाच्या डॉ. व्ही. एन. आचार्य ओरेशन सत्रात डॉ. विवेक कुटे यांनी भारतातील स्वॅप ट्रान्सप्लांटेशन प्रोग्राम यावर महत्त्वपूर्ण मांडणी केली. समारोपप्रसंगी या तीन दिवसीय परिषदेच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेत रेनल पॅथॉलॉजी व नेफ्रोक्रिटिकल केअर या विशेष कार्यशाळा, शोधनिबंध सादरीकरणासाठी सायलेंट हॉलची संकल्पना, तसेच ज्येष्ठ तज्ज्ञांचे विचार मांडणारा होलोग्राम हे विशेष आकर्षण ठरले. त्र्यंबकेश्वर दर्शन आणि प्रियंका बर्वे यांच्या संगीत संध्या कार्यक्रमाला डॉक्टरांचा प्रतिसाद लाभला. आयोजन समिती अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर, सचिव डॉ. नागेश अघोर, सायंटिफिक कमिटीचे डॉ. कैलास शेवाळे, आयएसएन पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सल्गिया, सचिव डॉ. उमापती हेगडे, डॉ. एम. एम. राजापूरकर आणि डॉ. शिशिर गंग यांच्या सहकार्यामुळे परिषद यशस्वी झाली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.