नाशिक

पवित्र पोर्टल पदभरती

CD
टुडे एक --- (शिक्षकांचे संग्रहित चित्र वापरावे) --- समुपदेशनाद्वारे २१४ शिक्षकांना पदस्थापना (उपशीर्षक) ‘पवित्र पोर्टल’अंतर्गत प्रक्रिया; ‘उर्दू’तील ५१ शिक्षकांचा समावेश सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल पदभरती २०२५ अंतर्गत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांना पदस्‍थापना देण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेद्वारे पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने ही पदस्थापना देण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये असलेल्‍या उपलब्ध रिक्त पदे, उमेदवारांची पात्रता तसेच शासनाच्या नियमानुसार संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने पार पाडण्यात आली. उपलब्ध पदांची उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन, त्यांच्या पसंतीक्रमानुसार पदस्थापना देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे तसेच संपूर्ण आस्थापना लिपिक वर्गाने या प्रक्रियेसाठी कार्य केले. २१४ शिक्षकांना पदस्‍थापना पवित्र पोर्टल पदभरतीच्‍या प्रक्रियेत मराठी माध्यमातील १६३ शिक्षक तसेच उर्दू माध्यमातील ५१ शिक्षक, अशा एकूण २१४ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. पात्र शिक्षकांना योग्य पदस्थापना, शाळांना सक्षम मनुष्यबळ आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्देशाने राबविण्यात आलेली ही प्रक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देणारे सकारात्मक व भविष्यवेधी पाऊल ठरले आहे. चौकट शाळांना मिळणार आवश्यक मनुष्यबळ शिक्षक पदभरती व पदस्थापना प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना नियमित, गुणवत्तापूर्ण व अधिक परिणामकारक शिक्षण मिळण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT