नाशिक

बँकेच्या निबँकेच्या निवडणुकीत बँकेच्या निवडणुकीत वडणुकीत

CD
टुडे एक ॲंकर NSK26H29777 ------- जिल्हा बँकेच्या मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात लवकरच होणार जाहीर; निवडणूक नोव्हेंबरमध्ये लागण्याची चिन्हे सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम नाशिक सहनिबंधकांकडे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. लवकरच मतदार यादी जाहीर होऊन त्यावर हरकती व अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांकडून एकूण दोन हजार ४५० ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. हे ठराव सहनिबंधकांकडे पाठविण्यात आले. जळगाव जिल्हा बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विविध सहकारी सोसायट्यांसह इतर सहकारी सोसायट्यांकडून ठराव मागविले होते. २ सप्टेंबरला ठराव पाठविण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे २ सप्टेंबरअखेर विकास व शेती सहकारी संस्थांचे ८७६ आणि इतर सर्व सहकारी संस्था (दुग्ध संस्थासह) एक हजार ५७४ असे एकूण दोन हजार ४५० ठराव प्राप्त झाले. प्राप्त झालेले ठराव नाशिक सहनिबंधकाकडे पाठविले आहेत. तेथे ठरावांची छाननी झाली. अंतिम मतदारयाद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मतदानाची तारीखही ठरविली जाईल. निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक स्पष्ट होईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या बँकेच्या २३७ शाखा आणि १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. यंदाही नोव्हेंबर २०२६ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. चौकट नऊ दिग्गजांना पुन्हा मिळणार पुन्हा संधी या संभाव्य निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवार, गटबाजी आणि पॅनलच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष संजय पवारांसह संचालक एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह नऊ संचालकांना पुन्हा रिंगणात उभे राहण्याची संधी मिळणार आहे. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT