सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर वापरावा
जिल्हा पुरवठा विभागाचे सर्व तहसीलदारांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १७ : गणेशोत्सवासह आगामी सार्वजनिक सण- उत्सवांमध्ये विविध मंडळांद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसाद व भोजनासाठी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. घरगुती गॅसमुळे निर्माण होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना याबाबत निर्देश दिले आहेत. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनतर्फे याबाबतची मागणी करण्यात आली होती.
घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या बर्नर आणि गॅस प्रेशरमध्ये मोठा फरक असतो. भंडारखान्यात मोठ्या भांड्यांसाठी घरगुती सिलिंडर वापरल्यास अपघात घडून जीवित व वित्तहानी होऊ शकते. दुर्दैवाने अपघात घडल्यास घरगुती सिलिंडरचा बेकायदेशीर वापर झाल्याचे सिद्ध झाल्यास कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण मिळत नाही. त्यामुळे घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक किंवा सार्वजनिक कामासाठी वापर करणे धोकादायक आणि बेकायदेशीर ठरते. त्यामुळे महाप्रसाद अथवा भोजन बनविण्यासाठी केवळ व्यावसायिक सिलिंडरचाच वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व तहसीलदारांनी आपल्या तालुक्यातील गणेश मंडळांना सूचित करावे, असे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी दिले आहेत.
----------
गणेशोत्सव हा आपला पवित्र आणि आनंदाचा उत्सव आहे. या काळात महाप्रसाद तयार करताना व्यावसायिक सिलिंडरचाच वापर झाला पाहिजे. ही काळजी घेतल्यास घरगुती सिलिंडरच्या वापरामुळे घडणारे भविष्यातील धोके टळण्यास मदत होते. जिल्हा प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेत निर्णय घेतला असून, हे जनतेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे.
- नितीन सोळंके, राष्ट्रीय अध्यक्ष, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.