नाशिक

जलतरण स्पर्धेत नंदुरबारच्या आरंभीने १२ तास २३ मिनिटात पार केले ८१ किलोमीटरचे अंतर

CD
फोटो : NSK26H29782 नंदुरबार : मुर्शिदाबाद येथे निर्मल आरंभीचा सत्कार करतांना मान्यवर. ---------------------- जलतरण स्पर्धेत नंदुरबारच्या निर्मल आरंभीचा विक्रम ८१ किलोमीटरचे अंतर १२ तास २३ मिनिटात केले पार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार : पश्चिम बंगाल येथील मुर्शिदाबाद जलतरण संघटना आणि भारतीय जलतरण संघटनेच्या विद्यमाने आयोजित ८० व्या जागतिक लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत नंदुरबार येथील युवा जलतरणपटू निर्मल भूपेंद्रसिंग आरंभी याने ऐतिहासिक कामगिरी करीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. निर्मलने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत ८१ किलोमीटरचे अंतर अवघ्या १२ तास २३ मिनिटांत पोहून पूर्ण केले. शारीरिक-मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या आव्हानात्मक स्पर्धेत त्याने दाखवलेल्या जिद्दीचे कौतुक केले जात आहे. १२ तास २३ मिनिटात ८१ किलोमीटरचे अंतर सामान्य व्यक्तीसाठी चालत पूर्ण करणेही अत्यंत कठीण असताना निर्मलने हे पाण्यात पोहत अल्पावधीत पूर्ण करून एक नवा विक्रम नोंदविला आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा जलतरणपटू होण्याचा मान निर्मलने मिळवला आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रथम जलतरणपटू म्हणून निर्मलच्या नावाची विशेष नोंद झाली आहे. त्याच्या या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे. निर्मल याने स्व. बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव व सी.बी. वॉटर पार्क येथे सराव केला आहे. दुरुस्तीच्या कामासाठी जलतरण तलाव बंद असतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सी. बी. वॉटर पार्क येथे सरावाची सोय करुन दिली होती. निर्मलच्या या यशामागे प्रशिक्षक राहुल काळे, अमोल भोयर यांचे मार्गदर्शन, पालक भूपेंद्रसिंग आरंभी यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai Satara Bank Election Victory : सातारा जिल्हा बँकेत घडला इतिहास! स्व. शिवाजीराव देसाईंनंतर 45 वर्षांनी देसाई घराण्याची दमदार एन्ट्री; पालकमंत्र्यांचा उर आला भरुन

IND vs NZ, ODI: रोहित शर्मा न्यूझीलंडमध्ये घडवणार इतिहास? विश्वविक्रमांसह ७ मोठे पराक्रम करण्याची संधी

Mhada House: फक्त २० लाखांत म्हाडा देणार १,४०० घरे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कोकण मंडळाचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : माझ्याविरोधात षडयंत्र रचलं, वरून आदेश होते; पण त्यांच्यात कानफाडात मारण्याची हिंमत नव्हती, अजित घोरपडेंचा जयंत पाटलांना अप्रत्यक्ष इशारा

Diwali Bonus: राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त ७ हजार रुपयांपर्यंत बोनस; सरकारने जाहीर केल्या अटी

SCROLL FOR NEXT