टुडे पान एक मेन लिड
(कृपया दोन्ही बातम्या शेजारी-शेजारी सारख्याच लावाव्यात. दोन्ही बातम्यांमध्ये दोघांचे पासपोर्ट टाकावेत. दोन्ही बातम्यांच्या मध्ये रेल्वेचे चित्र टाकावे)
हीना गावित : NSK26H29809
-------
नंदुरबारमार्गे उधना- पुणे ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ला मंजुरी
पाठपुराव्याला यश मिळालेे : माजी खासदार डॉ. हीना गावित
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १६ : मध्य व पश्चिम रेल्वे विभागाने उधना- पुणे या मार्गासाठी ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ रेल्वेगाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातून पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठे सोय झाली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मागणी पूर्ण झाल्याने नागरिक आणि व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. तत्कालीन खासदार म्हणून आपण यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, असे डॉ. हीना गावित यांनी म्हटले आहे.
----------
पुणे येथे जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडी उपलब्ध करून द्यावी, ही मागणी नंदुरबार जिल्ह्यातील प्रवासी वर्गाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. मुंबईपासून दिल्लीपर्यंत अनेक स्तरावर याबाबत निवेदने दिली होती. तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे पत्र दिले होते. रेल्वे विभागाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. या मागणीला आता यश मिळाले आहे, असे डॉ. गावित यांनी सांगितले. सदर रेल्वेगाडी उधना रेल्वे स्टेशनहून निघाल्यावर जळगाव लाईनने नंदुरबारमार्गे मनमाड- दौंड क्वार्ड लाईनने जोडली जाणार आहे. उधना- नंदुरबार, अमळनेर, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, दौंड क्वॉडलाईन, हडपसरमार्गे पुण्याला पोहोचेल. या रेल्वे गाडीचा गाडी क्रमांक व नियोजन अंतीम टप्प्यात असून, प्रक्रिया सुरू आहे. यामुळे नंदुरबारसह जळगाव, धुळे, अमळनेर भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. आधुनिक कोच, चांगली सिटींग, चार्जिंग सुविधा अशा सोयी- सुविधा यात उपलब्ध राहणार आहेत. शिक्षण, आरोग्य आणि उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय दूर होणार आहे, असेही डॉ. गावित म्हणाल्या.
---------------------
(पासपोर्ट फोटो NSK26H29808 : चंद्रकांत रघुवंशी)
-----------
नंदुरबारसह खानदेशातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार
रेल्वे प्रशासनाने मागणीची दखल घेतली : आमदार चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार, ता. १६ : पुण्याला जाण्यासाठी नंदुरबार रेल्वे स्थानकावरून पुणे जाण्यासाठी सोयीची रेल्वे नव्हती. मात्र, आता रेल्वे विभागाने उधना ते पुणे अमृतभारत एक्स्प्रेसला मंजुरी दिल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. याबाबत आपण रेल्वे प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला होता. तसेच, तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि पश्चिम रेल्वेचे जी. एम. प्रदीपकुमार यांना वेळोवेळी निवेदने दिली होती. आपल्या पाठपुराव्याला यश आले असून, यामुळे नंदुरबारसह खानदेशातील प्रवाशांची मोठी अडचण दूर झाली आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.
--------
नंदुरबार येथून पुणे जाण्यासाठी रेल्वे सुरू करावी, यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले असता याबाबतचे निवेदन दिले होते. तसेच, पश्चिम रेल्वेचे जी.एम प्रदीप कुमार हे नंदुरबारात आले असता त्यांना निवेदन दिले होते. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वे विभागाने उधना- पुणे अमृतभारत रेल्वे गाडी सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे, असे आमदार रघुवंशी म्हणाले.
उधना- जळगाव रेल्वे मार्गावरील नंदुरबार हे अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. जिल्ह्यातील अनेक व्यापारी, कामगार, विद्यार्थी हे खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहनांनी पुणे येथे कामकाजानिमित्त जात असतात. पुणे जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे गैरसोयींचा सामना करावा लागत होता. परंतु, आता या रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा आनंद आहे, असेही आमदार रघुवंशी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.