मेन फिचर टुडे चार
---
लोगो : कारने चिरडण्याचा प्रयत्न
--
होय, मालकानेच दुचाकीस्वारास दिली धडक
पिस्तूलसह अटकेतील चालकाचा कबुली जबाब; संशयिताचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शिरसोली रस्त्यावर दुचाकीस्वारास कार खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी संशयित गुटखामाफिया दीपक चेतवानीविरुद्ध गुन्हा दाखल असून, तो ७५ दिवसांपासून फरार आहे. त्याच्या वाहनचालकास पोलिसांनी नुकतेच गावठी कट्ट्यासह अटक केली असून, त्याने पोलिस कोठडीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जळगाव - पाचोरा रस्त्यावर शिरसोलीकडून येणाऱ्या दुचाकीला सुसाट कारने धडक दिल्याची घटना २ जुलैला सकाळी ८.०५ वाजता घडली होती. या अपघातात रविकुमार वासदेव राजपाल (वय ४६) हे गंभीर जखमी झाले होते. गुटखामाफियांकडून रविकुमार यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा हा सर्व प्रयत्न होता, हे एमआयडीसी पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच १९, ईजी ४९५२) जप्त केली असून, या प्रकरणी अद्याप मुख्य संशयित दीपक चेतवानी पोलिसांना सापडलेला नाही.
चालकाने केला भांडाफोड
गुन्ह्यातील मुख्य संशयिताचा शोध घेत असतानाच ११ ऑगस्टला दुपारी गुन्हेशोध पथकाने कुसुंबा येथील रहिवासी राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६) याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतल्यावर त्याच्याजवळ गावठी कट्टा आढळून आला. याप्रकरणी बेकायदा शस्त्र बाळगल्याचा स्वतंत्र गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला. परदेशीची कसून चौकशी केल्यावर २ जुलैला तो मालक दीपक चेतवानी याच्यासोबत त्या कारमध्ये होता. मात्र, कार चेतवानी स्वतः चालवत होता. सकाळी आठच्या सुमारास शिरसोली रस्त्यावर दुचाकीस्वार रविकुमार राजपाल याला दुचाकीसह चिरडून टाकण्यासाठीच त्याला धडक दिल्याची कबुली त्याने आपल्या जबाबात नोंदविले असून, त्या अनुषंगाने पेालिसांनी पुराव्यांचे संकलन केले आहे.
बऱ्हाणपूर गुटख्याचे ''हेडक्वार्टर''
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याचा माल मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने दाखल होत आहे. सद्या गुटख्याच्या मोठ्या ‘डील्स’साठी संशयित गुटखामाफिया दीपकने बऱ्हाणपूर येथे ठाण मांडले असून, सर्व सुत्रे येथूनच हलविण्यात येत आहे. त्याच्या अटकेने पुरवठा साखळी नक्कीच खंडित होईल, असेही सांगण्यात आले. जळगावसह छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबारला याच मार्गाने गुटख्याचा पुरवठा केला जात आहे.
चौकट
खंडपीठाने अर्ज फेटाळला
संशयित दीपक चेतवानी याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व नाकारल्यानंतर त्याने खंडपीठात अर्ज दाखल केला. मात्र, पोलिस तपासातील प्रगती आणि पुरावे सरकारपक्षाने सादर केल्याने तेथेही त्याला जामीन मिळू शकला नाही. एमआयडीसीचे पोलिस पथक पुन्हा त्याच्या शोधात लागले आहे.
कोट...
पूर्वी अपघाताच्या दाखल गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी व जखमीचा जबाब याच्या आधारावर तपास केल्यानंतर प्राणघातक हल्ल्याचा प्रकार निष्पन्न झाला. तसे कलम वाढविण्यात आले. त्याच्या वाहनचालकालाही अटक झाली असून, त्यानेही कबुली दिली आहे. संशयिताला लवकरच अटक होईल.
- बबन आव्हाड
वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.