लोगो- NSK26H29803
धुळे टुडे २ साठी मेन...
---
धुळेकरांनो, वैद्यकीय चाचण्यांचा खर्च आता विसरा!
---
धुळे महापालिकेतर्फे मोफत सुविधा उपलब्ध; सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा; लाभाचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : धुळेकर नागरिकांच्या आरोग्याच्या अनुषंगाने धुळे महापालिकेने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात विविध वैद्यकीय चाचण्यांची व्यवस्था महापालिकेच्या पाच दवाखान्यांमध्ये करण्यात आली असून, विविध तपासण्या या मोफत उपलब्ध केल्या आहेत. खासगी दवाखाने व लॅब्समध्ये या तपासण्यांसाठी बऱ्यापैकी पैसे मोजावे लागतात. हा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा ठरतो. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध केलेली ही सुविधा सर्वसामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
विविध आरोग्य समस्या घेवून दवाखान्यांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना आजारापेक्षा वैद्यकीय खर्च किती लागणार याचीच चिंता असते. सर्वसामान्य नागरिकांसाठी तर ही मोठी समस्या असते. अनेकवेळा अशा खर्चाच्या चिंतेमुळेच अनेकजण छोट्या-मोठ्या आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करतात. अनेकजणांना पुढे त्याचे गंभीर परिणामही सहन करावे लागतात. या वैद्यकीय खर्चात सर्वाधिक खर्च विविध वैद्यकीय चाचण्यांचाही असतो. खासगी डॉक्टर्स अशा चाचण्या लिहून देतात. त्या रुग्णांना खासगी लॅबमध्ये कराव्या लागतात. त्याचा खर्च सर्वसमान्यांना मोठा आर्थिक भार देणाऱ्या ठरतात. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता धुळे महापालिकेने आरोग्य तपासण्यांचा हा खर्च शुन्यावर आणण्याचा अत्यंत महत्वपूर्ण व लोकोपयोगी निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या पाच दवाखान्यांमध्ये विविध आरोग्य तपासण्या मोफत करुन देण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध केली आहे. महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वेळेवर तपासणी, आजारांचे लवकर निदान आणि आवश्यक उपचारासाठी मदत मिळावी या उद्देशाने ही सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.
---
या दवाखान्यात सुविधा
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र : प्रभातनगर, राऊळवाडी, कृष्णनगर, हजारखोली व नदीरोड या आरोग्य केंद्रामध्ये मोफत वैद्यकीय चाचण्यांची ही सुविधा उपल्ध आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी एक व दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान तसेच शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे.
गरजूंनी लाभ घ्यावा
आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता आवश्यक वैद्यकीय तपासण्या वेळेत करून घ्याव्यात. त्यासाठी आपल्या जवळच्या धुळे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपलब्ध निःशुल्क तपासणी सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
---
...चौकट...
या २० तपासण्या मोफत
HB, VDRL, HIV, HBsAg, Urine Albumin, BSL Random, UPT, Malaria Parasite, Sputum Collection for T.B., CBC, LFT, RFT, Lipid Profile, BSL Fasting + PP, Serum Uric Acid, Thyroid, SGOT, SGPT, Blood Urea आणि Blood Group आदी तपासण्यांचा यात समावेश आहे. यातील प्रत्येक चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये किमान ५०, १००, १५० ते अडीच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.