नाशिक

सेवा सप्ताहात तपासणी

CD
धुळे : टुडे पान १ साठी... -- फोटो क्रमांक : 29804 धुळे : सेवा सप्ताहाअंतर्गत मुंबईतील किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी रवाना होणाऱ्या बालकांसह पालक, एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे व आरबीएसके पथक. -- मोफत शस्त्रक्रियेसाठी बालके मुंबईकडे रवाना -- दहा चिमुकल्यांना मिळणार जीवनदान; सेवा सप्ताहात तपासणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेवा सप्ताह अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि एबी फाउंडेशनतर्फे लहान बालकांसाठी हृदय तपासणी क्लिनिक सुरू करण्यात आले. याअंतर्गत २०० बालकांची तपासणी झाली. त्यातील १० चिमुकल्यांची मुंबईतील किम्स हॉस्पिटलमध्ये मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी निवड झाली असून, बुधवारी (ता. १६) त्यांना उपचारासाठी रवाना करण्यात आले. - चिमुकल्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर उपचाराची चिंता असली तरी आपल्या पाल्याला निरोगी आयुष्य मिळणार ही आशा त्यांच्या मनात आहे. उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या या बालकांचा आणि पालकांचा प्रवास, राहण्याची व्यवस्था, भोजन व उपचाराचा संपूर्ण खर्च मोफत करण्यात आला आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांसाठी हा उपक्रम खऱ्या अर्थाने मोठा आधार ठरला आहे. या सप्ताहाचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, एबी फाउंडेशन आणि किम्स हॉस्पिटलतर्फे रुग्णालयाच्या कॅथलॅबमध्ये बालकांसाठी स्वतंत्र कक्षाचे लोकार्पण झाले आहे. याचा लाभ धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा आणि चाळीसगाव परिसरातील ० ते १८ वयोगटातील गरजू बालकांना मिळणार आहे. किम्स हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास व त्यांची टीम, एबी फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश देवरे आणि आरबीएसकेच्या टीमने बालकांची तपासणी व उपचाराची प्रक्रिया राबवली. या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र सोनवणे यांचे सहकार्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT