नाशिक

शन दुकाशन दुकानातून एक लाखांहूननातून एक लाखांहूनशन दुकानातून एक लाखांहून

CD
मेन फिचर (एआय इमेज वापरावी) ------------- रेशन दुकानातून साडीची ‘ओवाळणी’ रक्षाबंधनानिमित्त ‘अंत्योदय’ योजनेतील सव्वा लाख महिलांना लाभ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय रेशनकार्डधारक महिलांना शासनाकडून रेशन दुकानांमार्फत प्रत्येकी एक साडी मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सव्वालाखांहून अधिक साड्यांचे वितरण करण्यात आले असून, गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. यंदाही शासन निर्देशानुसार पुन्हा जुलै २०२६ दरम्यान अंत्योदय लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त मोफत साडी वितरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासाठी एकूण १ लाख ३८ हजार ८४५ साड्यांची मागणी जिल्हा पुरवठा शाखेकडून शासनाकडे नोंदविली होती. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागातर्फे अंत्योदय गोरगरीब कुटुंब लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुरवठा विभागाला १ लाख ३८ हजार ८४५ साड्यांचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत जुलैत १ लाख ३४ हजार ७३५ साड्यांचे वितरण स्वस्त धान्य रेशन दुकानात पोचविण्यात आल्या असून ११० साड्या गोदामात शिल्लक आहेत. तसेच तालुकास्तरावर ग्रामीण भागात अद्याप १७ हजार २२८ साड्यांचे वितरण शिल्लक असून अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानातून ई पॉज मशिनद्वारे मिळणाऱ्या मोफत साडीचा लाभ घ्यावयाचा आहे. चौकट ''ई-पॉस''द्वारेच वितरण तालुक्यात ग्रामीण स्तरावर रास्त भाव दुकानातून ''ई-पॉस'' यंत्राद्वारे जसे धान्य वितरण केले जाते, त्याचप्रमाणे अंत्योदय कुटुंबातील लाभार्थीला ''ई-पॉस''द्वारे प्रत्येकी एक साडीचे वितरण केले जात आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून राज्य शासनाकडे अंत्योदय शिधापत्रिकाधारकांच्या वर्षाला प्रतिकुटुंब एक मोफत साडी दिली जाते. मागील वर्षापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावर्षीही जुलै २०२६ पासून साडी वाटप केले जात आहे. आतापर्यंत सरासरी १ लाख १७ हजार ६१७ अंत्योदय लाभार्थ्यांना मोफत साड्यांचे वितरण स्थानिक पातळीवरून करण्यात आले असून अद्याप १७ हजार २२८ साडयांचे वितरण शिल्लक आहे. ----------- तालुके--मंजूर साड्या--वितरण--टक्के जळगाव--१३,३४०--८२.६० भुसावळ--५,२००--९३.१२ यावल--१०,६४७--८८.४० रावेर--१०,६३०--८८.८९ मुक्ताईनगर--८,१४८--९३.४५ अमळनेर--८,९१२--८८.७३ चोपडा--९,९६६--७५.४८ एरंडोल--५,७९६--९६.०० पारोळा --७,३६६--९५.३० चाळीसगाव--१७,१९३--९०.८४ जामनेर--१०,२१३--८८.५७ पाचोरा--९,५५९--७७.४२ भडगाव--६,९६३--९३.६२ धरणगाव--७,०७०--७०.६८ बोदवड--३,८४२--९५.९४ एकूण--१,३४,८४५--८७.२२ --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Lightning Strike Tragedy: सिल्लोडच्या दहिगावात शेतातील झोपडीवर वीज कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT