नाशिक

स्व.डॉ.दिलीपराव मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धा

CD
(कृपया बातमी अवश्‍य घ्यावी) फोटो : NSK26H29817 नंदुरबार : बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‌घाटन करताना प्राचार्य आर. आर. पाटील. शेजारी शोभराज खोंडे, प्रितेश पाटील, संतोष मराठे. ---------- आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्‌घाटन स्व. डॉ. दिलीपराव मोरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : स्व. डॉ. दिलीपराव मोरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सेंट मदर टेरेसा शाळेत आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा झाली. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष कुंदन पाटील व जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आर. आर. पाटील यांनी स्पर्धेचे उद्‌घाटन केले. या वेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत १४ शाळांचे एकूण २५२ विद्यार्थी सहभागी झाले. यापैकी सतरा वर्षाखालील एकूण १३० विद्यार्थी व अकरा वर्षाखालील एकूण १२२ विद्यार्थी सहभागी झाले. संस्थेचे सचिव डॉ. अभिजित मोरे यांच्या कल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते. शोभराज खोंडे यांच्या सहकार्यातून स्पर्धा झाली. स्पर्धेचे नियोजन प्रितेश पाटील व संतोष मराठे यांनी केले. पूजा मंदाना व रुबीना सय्यद यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. प्राचार्या तेजस्वीता वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा उत्साहात झाली. जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली. प्रथम विजेत्यास पाच हजार रूपये, द्वितीय विजेत्यास चार हजार रूपये, तृतीय विजेत्यासाठी तीन हजार रूपये, उत्तेजनार्थ बक्षीस एक हजार रूपये रोख देण्यात आले. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली. अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम देवांशू भामरे (एस. ए. मिशन), द्वितीय काला लक्ष (एस. ए. मिशन), तृतीय श्रुत जैन (पोद्दार स्कूल), उत्तेजनार्थ बक्षीस गोगीया प्रेम (सेंट मदर टेरेसा) यांनी मिळविले. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक भावेश मराठे (एस. ए. मिशन), द्वितीय प्रहर्ष पाटील (एस. ए. मिशन), तृतीय कृष्णा पाटील (के. आर. पब्लिक स्कूल), उत्तेजनार्थ बक्षीस आरव गोसावी (चावरा स्कूल) याने मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT