नाशिक

पाळधीत बगीच्यासह ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती

CD
ॲंकर (आवश्‍यक) --- NSK26H29815 पाळधी : बगीच्यासह ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. --- पाळधीत साकारणार बगीच्यासह ‘ऑक्सिजन पार्क’ पालकमंत्री पाटील : उत्सवाच्या खर्चातून हिरवाई; ‘जीपीएस’चा उपक्रम सकाळ वृत्तसेवा पाळधी, ता. १६ : गणपती व नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून त्याच निधीतून गावासाठी सुंदर बगीचा उभारण्याचा जीपीएस मित्र परिवाराचा निर्णय हा सामाजिक भान जपणारा आणि इतरांसाठी अनुकरणीय उपक्रम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी खुर्द येथे बहिणाबाई मार्टजवळ, स्मशानभूमीच्या पुढील परिसरात उभारण्यात येणाऱ्या आकर्षक बगीच्याचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले. पालकमंत्र्यांच्या सूचनेतून व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या संकल्पना व प्रयत्नातून जीपीएस मित्र परिवाराने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रताप पाटील यांनी बगीच्याची रचना, प्रस्तावित ऑक्सिजन पार्क, नागरिकांना होणारा उपयोग आणि भविष्यातील देखभाल याबाबत सविस्तर माहिती दिली. यांची होती उपस्थिती या भूमिपूजन सोहळ्यास उद्योजक शरद कासट, सुनील झंवर,सिद्धिविनायक महागणपतीचे अध्यक्ष श्रीकांत मणियार, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, पाळधी बुद्रुकचे सरपंच विजू बापू, पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी, माजी उपसभापती दिनकर पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप पाटील, उद्योजक दिलीप पाटील आदी उपस्थित होते. भूषण माळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत झंवर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Seva Sanklap Abhiyan : ५० लाखांहून अधिक नागरिकांना मोफत जमीन नोंदणी, १७ सप्टेंबरला दीपोत्सवाचा शुभारंभ; महिनाभर चालणार ‘सेवा-संकल्प अभियान’

Gold Hallmarking Charges : दसरा-दिवाळीपूर्वी सोनं-चांदी महागणार? BIS या निर्णयामुळे खरेदीदारांच्या खिशाला बसणार कात्री

MPSC Exam : एक दोन गुणाने यश हुलकावणी देत होते; अखेर योगेशने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळविले यश

Stray Dog Attacks : परळीत पिसाळलेल्या कुत्र्याचा 35 वर जणांना चावा, शहरात भीती, 26 जणांवर उपचार सुरू

SCROLL FOR NEXT