नाशिक

सहा दिवस रात्री बारापर्यंत वाद्याला परवानगी

CD
गणेशोत्सवात रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी गौरी विसर्जनासह २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान आदेश लागू सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१६ : आनंदपर्व असलेल्या गणेशोत्सवात यंदा सहा दिवस रात्री बारापर्यंत गणेश आरास, देखावे आणि ध्वनिक्षेपकास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. गौरी विसर्जनाचा दिवस शनिवारी (ता. १९) तसेच २१ ते २५ सप्टेंबरदरम्यान ही सवलत लागू राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवास सुरुवात झाल्याने शहरासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण आहे. उत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेल्या आकर्षक आरास आणि देखाव्यांचा आनंद नागरिकांना रात्री उशिरापर्यंत घेता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक अधिकारात ही परवानगी दिली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील नियम ५ च्या उपनियम (३) नुसार ही सवलत देण्यात आली आहे. मात्र, ध्वनिक्षेपकास परवानगी देतानाच संबंधित मंडळांना शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात सार्वजनिक मंडळांच्या आरास व देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. नवरात्रोत्सवातही तीन दिवस सवलत पुढील महिन्यात होणाऱ्या नवरात्रोत्सवातही तीन दिवस रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी देण्यात आली आहे. १९, २० आणि २५ ऑक्टोबर या तीन दिवसांचा त्यात समावेश आहे. तसेच दिवाळीतील लक्ष्मीपूजन (८ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर) आणि नववर्ष स्वागत (३१ डिसेंबर) या दिवशीही रात्री बारापर्यंत निर्धारित नियमांचे पालन करून ध्वनिक्षेपक वाजविण्यास परवानगी असणार आहे. गणेशोत्सवात रात्री १२ पर्यंत परवानगी १९ सप्टेंबर : गौरी विसर्जन २१ सप्टेंबर : आरास व देखावे पाहणे २२ सप्टेंबर : आरास व देखावे पाहणे २३ सप्टेंबर : आरास व देखावे पाहणे २४ सप्टेंबर : आरास व देखावे पाहणे २५ सप्टेंबर : गणेश विसर्जन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT