नाशिक

प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी यांचा आदर्श पुरस्काराने गौरव

CD
फोटो : NSK26H29825 नंदुरबार : प्राचार्य महेंद्र रघुवंशी यांना पुरस्कार प्रदान करताना विघ्नेश कुलकर्णी, फत्तेचंद रांका, डॉ. सुधाकर जाधवर, ॲड. शार्दूलराव जाधवर, सुरेखा जाधवर. ------------------- प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी आदर्श पुरस्काराने सन्मानित सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : येथील जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांचा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यिूटतर्फे हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. पुणे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टट्यिूटतर्फे आदर्श पुरस्कार वितरण सोहळा झाला. यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विघ्नेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास रांका ज्वेलर्सचे अध्यक्ष फत्तेचंद रांका प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दूलराव जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. या सोहळ्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मराठवाडा मित्र मंडळाच्या डेक्कन जिमखानाचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब जाधव, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. पराग सदगीर यांचाही गौरव करण्यात आला. पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. प्राचार्य डॉ. महेंद्र रघुवंशी यांनी महाविद्यालयातील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, संचालक मंडळ, अधीक्षक पुष्पेंद्र रघुवंशी आदींनी त्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update: शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली हेल्थ अपडेट

विजय शंकरसह ३ भारतीय खेळाडू खेळणार Afghanistan Premier League? ड्राफ्टमध्ये २९ पाकिस्तानी अन् १० बांगलादेशी खेळाडूंचाही समावेश

Latest Marathi News Live Update : शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

'महाराजांचे गडकिल्ले, जंगलं आणि डोंगर धोक्यात'; सयाजी शिंदेंचा संतापले, सह्याद्री वाचवण्यासाठी सुरू केली मोठी चळवळ

''उमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा विवाह शरिया कायद्यानुसार बेकायदेशीर'', 'ऑल इंडिया मुस्लिम जमात'चा आक्षेप

SCROLL FOR NEXT