नाशिक

भावजयीच्या निर्घृण खूनप्रकरणी दीराला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

CD
भावजयीच्या हत्येप्रकरणी दीराला फाशीची शिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : पैशांच्या वादातून भावजयीवर धारदार हत्याराने तब्बल ३५ वार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी दीर संतोष विष्णू आंबेकर (वय ३१, रा. कोकाटे चाळ, क्रांतीनगर, पंचवटी) याला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. न्या. आर. एन. पांढरे यांनी हा निकाल दिला. ३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री अकराच्या सुमारास गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संत कबीरनगर येथे ही घटना घडली. पूजा संदीप आंबेकर (वय २७) या नाना कदम यांच्या खोलीत राहत होत्या. आरोपी संतोष हा त्यांचा नात्याने दीर होता. पैशांच्या वादातून संतोषने पूजांच्या गालावर, छातीवर, पोटावर, हातावर, खांद्यावर, मानेवर आणि पाठीवर धारदार हत्याराने ३५ वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पूजांच्या आई चंद्रभागा प्रकाश मेढे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख व हवालदार सचिन सुपले यांनी तपास करून परिस्थितिजन्य व फॉरेन्सिक पुरावे तसेच साक्षीदारांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर व आर. पी. गावित यांनी साक्षीदारांचे जबाब, पंचनामे आणि वैद्यकीय पुरावे न्यायालयासमोर मांडले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने संतोष आंबेकर याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. अभियोग कक्षाचे सहाय्यक उपनिरीक्षक जयवंत गुळवे, कोर्ट पैरवी महिला पोलिस अंमलदार रंजना गायकवाड, रिना आहेर व अंमलदार सागर बागुल यांनी पाठपुरावा केला.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT