नाशिक

समुपदेशनाद्वारे २१४ शिक्षकांना पदस्थापना

CD
(शिक्षकांचे संग्रहित चित्र वापरावे.) --- समुपदेशनाद्वारे २१४ शिक्षकांना पदस्थापना (उपशीर्षक) ‘पवित्र पोर्टल’अंतर्गत प्रक्रिया; ‘उर्दू’तील ५१ शिक्षकांचा समावेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल पदभरती २०२५ अंतर्गत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांना पदस्‍थापना देण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेद्वारे पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने ही पदस्थापना दिली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. उपलब्ध पदांची उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन, त्यांच्या पसंतीक्रमानुसार पदस्थापना देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे, तसेच संपूर्ण आस्थापना लिपिकवर्गाने कार्य केले. पवित्र पोर्टल पदभरतीच्‍या प्रक्रियेत मराठी माध्यमातील १६३ शिक्षक, तसेच उर्दू माध्यमातील ५१ शिक्षक, अशा एकूण २१४ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. पात्र शिक्षकांना योग्य पदस्थापना, शाळांना सक्षम मनुष्यबळ आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्देशाने राबविलेली ही प्रक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देणारे सकारात्मक व भविष्यवेधी पाऊल ठरले आहे. --- चौकट शाळांना मिळणार आवश्यक मनुष्यबळ शिक्षक पदभरती व पदस्थापनेमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना नियमित, गुणवत्तापूर्ण व अधिक परिणामकारक शिक्षण मिळण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

SCROLL FOR NEXT