लोगो : मार्केट अपडेट्स
NSK26H29833
जळगाव : श्रीगणेश स्थापनेच्या दिवशी सातपुडा ऑटोतर्फे दहा कुबोटा ट्रॅक्टर वितरित करण्यात आले, त्याप्रसंगी संचालक प्रा. डी. डी. बच्छाव व अधिकारी.
----
दहा कुबोटा ट्रॅक्टर वितरणाने
सातपुडा ऑटोत श्रीगणेशोत्सव
उपशीर्षक
जिल्ह्यातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : जगप्रसिद्ध जपानी कुबोटा ट्रॅक्टर कंपनीच्या दणकट व विश्वासार्ह ट्रॅक्टरची ओळख असलेल्या सातपुडा मोटर्स, जळगाव यांच्या माध्यमातून गणेश स्थापनेच्या पवित्र पहिल्याच दिवशी जळगाव जिल्ह्यात दहा ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये कुबोटा ट्रॅक्टरच्या दणकटपणा, कार्यक्षमता, आधुनिक जपानी तंत्रज्ञान आणि विश्वासार्हतेबाबत वाढता विश्वास दिसून येत असून, याचा प्रत्यय एकाच दिवशी झालेल्या १० ट्रॅक्टरच्या वितरणातून आला. उर्वरित ९ कुबोटा ट्रॅक्टर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.
याप्रसंगी सातपुडा मोटर्सचे संचालक प्रा. डी. डी.बच्छाव, किरण बच्छाव, उज्वल बच्छाव, व्यवस्थापक बाळू पाटील, विक्री अधिकारी योगेश पाटील, संदीप सूर्यवंशी यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कुबोटा ट्रॅक्टरच्या विविध मॉडेल्सची सविस्तर माहिती, टेस्ट ड्राइव्ह व खरेदीसाठी सातपुडा मोटर्स, अजिंठा चौफुली, जळगाव येथे संपर्क साधावा संचालक किरण बच्छाव यांनी कळविले आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.