नाशिक

एसएमबीटी व महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य अंतर्गत करार

CD
फोटो -NSK26H29836 पोलिसांना ‘एसएमबीटी’मध्ये कॅशलेस उपचार ------------------------------------ ‘महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजने’अंतर्गत विशेष करार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांची सुविधा कॅशलेस पद्धतीने मिळावी, यासाठी नाशिक येथील एसएमबीटी हॉस्पिटल आणि ‘महाराष्ट्र पोलिस कुटुंब आरोग्य योजना’ यांच्यात विशेष करार करण्यात आला आहे. या करारामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी आगाऊ रक्कम न भरता विविध गंभीर आजारांवर उपचार घेता येणार आहेत. या योजनेअंतर्गत एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ५० हून अधिक गंभीर व आपत्कालीन आजारांवरील उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. हृदयरोगावरील अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, वॉल्व्ह रिपेअर व रिप्लेसमेंट, तसेच कर्करोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या उपचारांचा त्यात समावेश आहे. रस्ता अपघात, तीव्र मेंदू विकार, पक्षाघात, जळीत, विषबाधा तसेच तीव्र उदरवेदना यांसारख्या आपत्कालीन स्थितीतही तातडीची उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. कान-नाक-घसा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील आपत्कालीन उपचार, डोळ्यांचे विकार आणि लहान मुलांच्या जन्मजात विसंगतींवरील तातडीच्या शस्त्रक्रियांचाही योजनेत समावेश आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये २६ हून अधिक स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवा उपलब्ध असून, विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर २४ तास सेवा देतात. अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, १७ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, अल्ट्रा मॉड्युलर कॅथलॅब, सीटी स्कॅन, एमआरआय, डिजिटल एक्स-रे, मॅमोग्राफी, संगणकीकृत पॅथॉलॉजी लॅब, २४ तास आपत्कालीन विभाग, रुग्णवाहिका आणि ब्लड बँक अशा सुविधा उपलब्ध आहेत. पोलिसांसाठी विशेष हेल्पलाइन पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना उपचाराबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलने विशेष २४ तास हेल्पलाइन सुरू केली आहे. रुग्ण व नातेवाइकांनी ८६०५१ ७०१७० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोट... पोलिस बांधवांच्या कुटुंबीयांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या सामाजिक भावनेतून हा करार करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आणि २४ तास आपत्कालीन सेवा पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. - सचिन बोरसे, संचालक, रुग्णसेवा, एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT