नाशिक

आदिवासी विकास मंत्री प्रा.अशोक उईके यांचे आव्हान

CD
दीपकेंनी जपतलाई आश्रमशाळेत जावे आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांचे आव्हान सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आदिवासी आश्रमशाळांना भेट देण्याची शृंखला चालू ठेवली असताना राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दीपकेंना गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत जाण्याचा सल्ला दिला. या शाळेत जाऊन तेथील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू का झाला, हे सर्वांना सांगावे, असे आव्हान मंत्र्यांनी दिले. दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेले मंत्री अशोक उईके यांनी गुरुवारी शासकीय विश्रमगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, आदिवासी आघाडीचे महामंत्री एन. डी. गावित उपस्थित होते. मंत्री उईके म्हणाले, की धानोरा तालुक्यातील जपतलाई ही शासकीय अनुदानित आश्रमशाळा १९९२ पासून सुरू होती. तीन वेळा आमदार, एकदा खासदार आणि एकदा मंत्री राहिलेल्या व्यक्तीच्या या शाळेत ७९ विद्यार्थिनी एकाच खोलीत राहत होत्या. खिडकीतून आलेल्या सापाने येथील सहा मुलींना दंश केला होता. त्यातील तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्या शाळेवर आम्ही तत्काळ कारवाई केली आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित केले. या शाळेत अभिजित दीपकेंनी भेट द्यायला हवी. या विद्यार्थिनींच्या मृत्यूला जबाबदार कोण, याची त्यांनी विस्तृत माहिती घेतली तर बरे होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यातील शाळांची तपासणी राज्यात आदिवासी आश्रमशाळेतील ५८४ विद्यार्थ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या शाळा, संस्थाचालकांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री प्रा. उईके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT