नाशिक

आता तालुकास्तरावर सौर योजनांची मिळणार माहिती

CD
ॲंकर (सोलरचे चित्र वापरावे) आता तालुकास्तरावर मिळणार सौर योजनांची माहिती महावितरण उभारणार ‘किओस्क’; अर्ज, माहिती, बँक कर्जाची सुविधा एकाच ठिकाणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना आता तालुकास्तरावरच विविध योजनांची माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर ‘सेवा सेतू कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत महावितरणकडून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी विशेष (किओस्क) माहिती केंद्र उभारण्यात येणार आहेत. ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ तसेच ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. किओस्कवर महावितरणचे कर्मचारी नागरिकांना सौरऊर्जा प्रकल्पासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया समजावून सांगतील. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शनही केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कॅम्पमध्ये विविध बँकांचे प्रतिनिधीही उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या बँक कर्जाची माहिती घेण्यासोबतच त्यासाठी अर्ज करण्याची सुविधाही नागरिकांना एकाच ठिकाणी मिळणार आहे. यामुळे सौरऊर्जा योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना विविध कार्यालये किंवा संस्थांकडे स्वतंत्रपणे जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. चौकट महावितरणचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व तालुकास्तरावर किओस्क उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी ‘सेवा सेतू कॅम्प’चा लाभ घेऊन सौरऊर्जा योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT