नाशिक

जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

CD
NSK26H29850 जळगाव : स्वच्छता सेवा अभियानातंर्गत गावात स्‍वच्‍छता करताना नागरिक व कर्मचारी. ------------------- जिल्ह्यात स्वच्छता सेवा अभियानाला सुरवात ------ लोकचळवळ म्हणून अभियान राबविण्याचे सीईओंचे आवाहन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : स्वच्छ व विकसित भारताच्या उभारणीच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. याची सुरवात गुरुवारपासून (ता.१७) जिल्‍ह्यात झाली आहे. ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत, विकसित भारत’ ही यावर्षीच्या अभियानाची संकल्पना आहे. अभियानाच्या कालावधीत गावांमधील अस्वच्छ व अडचणीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाईल. यानंतर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन केंद्रांना भेटी, शाळा- महाविद्यालयांत स्वच्छता ज्ञानयात्रा, सफाईमित्र व स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी व सन्मान शिबिरे, वृक्षारोपण, कचरा वर्गीकरणाबाबत घरोघरी जनजागृती, ‘वेस्ट टू वेल्थ’ व ‘वेस्ट टू आर्ट’ यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांना प्रोत्‍साहित करा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच यांनी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करून अभियानाचे नेतृत्व करावे. नागरिकांना अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देशही करिश्मा नायर यांनी दिले आहेत. लोकचळवळ म्‍हणून राबवा स्वच्छतेसाठी केवळ प्रशासनाचे प्रयत्न पुरेसे नाहती. गावागावांतील जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले आहे. शिवाय शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळांमधून स्वच्छता ज्ञानयात्रा व जनजागृती फेऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा. सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट व युवक मंडळांनी श्रमदान व स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT