नाशिक

सोन पावलांनी घरोघरी ज्येष्ठा गौरीचे आगमन; सुवासिनींमध्ये उत्साह

CD
टुडे ४ : सेकंड मेन --- NSK26H29881 (फोटो चार कॉलम वापरावा) जळगाव : ट्रान्स्पोर्टनगरमधील शांतीनिकेतन हाउसिंग सोसायटीतील करे कुटुंबीयांच्या घरी महालक्ष्मींचे आगमन झाले. आगमनावेळी पूजन करताना. (छायाचित्र : संधिपाल वानखेडे) --- सोनपावलांनी घरोघरी ज्येष्ठा गौरींचे आगमन सुवासिनींमध्ये उत्साह; रोषणाईसह सजावटीने घराघरांत चैतन्य सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : गणेशोत्सवाच्या उत्साहात आता ज्येष्ठा गौरीच्या आगमनाने घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी (ता. १७) शहरातील विविध भागांत पारंपरिक पद्धतीने ज्येष्ठा गौरीचे स्वागत करण्यात आले. गौरीच्या आगमनानिमित्त महिला वर्गात विशेष उत्साह दिसून आला. घरांची स्वच्छता, सजावट तसेच गौरीच्या पूजेसाठी आवश्यक साहित्याची खरेदी यामुळे बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण होते. गणेशोत्सवात ज्येष्ठा गौरीला विशेष महत्त्व आहे. अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार गौरीचे आगमन केले जाते. काही ठिकाणी गौरीच्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली, तर काही घरांमध्ये धान्य, फुलांची आकर्षक सजावट करून गौरीचे स्वागत करण्यात आले. गौरीच्या आगमनापूर्वी महिलांनी घरांची स्वच्छता करून आकर्षक रांगोळ्या काढल्या. दारासमोर तोरणे, फुलांची सजावट तसेच रोषणाई करण्यात आली होती. गौरीच्या पूजेसाठी विविध प्रकारची फळे, भाज्या, धान्य, मिठाई आणि नैवेद्याचे पदार्थ तयार करण्यात आले. काही कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी, भाजी, भाकरी, खीर यांसह विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला. महालक्ष्मी पूजन गणेशोत्सवामुळे आधीच सजलेल्या बाजारपेठेत गौरी आगमनामुळे आणखी उत्साह वाढला आहे. दरम्यान, काही कुटुंबांमध्ये गौरी आगमनानंतर दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन व नैवेद्याची परंपरा आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस घराघरांत धार्मिक वातावरण राहणार आहे. गौरीच्या निमित्ताने नातेवाईक व आप्तेष्टांना निमंत्रित करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. चौकट आधुनिक सजावटीची जोड यंदा अनेक कुटुंबांनी ज्येष्ठा गौरीच्या सजावटीसाठी पारंपरिक वस्तूंसोबत आधुनिक सजावटीचा वापर केला आहे. फुले, पाने, विविध रंगांच्या रांगोळ्या, आकर्षक पडदे आणि रोषणाईच्या माध्यमातून गौरीचे सजावट करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT