नाशिक

जळगावात २७ला रंगणार भावगीतांचा सुरेल संगम

CD
जळगावात २७ ला रंगणार भावगीतांचा सुरेल संगम उपशीर्षक गोदावरीतर्फे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू केलेल्या ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेची परंपरा यावर्षी कायम असून यंदा ही स्पर्धा रविवारी (ता.२७) होणार आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे २९ वे वर्ष असून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध होऊन अनेक गायक कलाकार या स्पर्धेने दिले आहे. नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून स्पर्धेक सहभागी होत असतात. इयत्ता पहिली ते सहावी बालगट, इयत्ता सातवी ते बारावी कुमार गट, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतेे. स्पर्धा २७ सप्टेंबरला सकाळी आठला सुरू होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे. चौकट असे आहेत नियम किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल सादर करता येतील. बाल गटासाठी बालगीते व भावगीते ग्राह्य धरली जातील. स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला एकच गीत सादर करता येईल आणि गीताचे दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी असेल. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT