एन्कर
फोटो : H29841, H29839
माहेरवाशिणी आल्या माहेरपणाला....!
गौराईंचे वाजतगाजत स्वागत ; आज पूजन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : गौराईंच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे. शहरातील विविध भागांत घराघरांत गौराईंचे पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. सकाळपासूनच महिलांची गौराईंच्या स्वागताची तयारी, सजावट आणि पूजेची तयारी करण्यासाठी लगबग सुरू होती.
गौराईंच्या स्वागतासाठी अनेक घरांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. फुलांच्या माळा, तोरणे, पणत्या तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने घरांचा परिसर सजविण्यात आला होता. सायंकाळी विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करून गौराईंचे स्वागत करण्यात आले. या वेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मंगलगीते व ओव्या म्हणत आनंदाचा सोहळा साजरा केला. गौराईंच्या आगमनाला महिलांच्या जीवनात विशेष महत्त्व असल्याने माहेरवाशिणींसह कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ज्येष्ठ महिलांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीने पूजा विधी पार पडले. काही घरांमध्ये गौराईंसाठी आकर्षक देखावे उभारण्यात आले असून, सजावटीतून पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक कल्पकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. शहरातील विविध परिसरांमध्ये गौराईंच्या आगमनामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवातील या मंगलमय परंपरेमुळे घराघरांत श्रद्धा, आनंद आणि उत्साह नांदत राहाे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. सणाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याने गाैराईंच्या तयार नैवेद्य ऑर्डरप्रमाणे करून मिळत आहे. आज (ता.१८) ज्येष्ठागाैरी पूजन सकाळपासून रात्री १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत पूजन करावे, असे धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी सूचित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.