नाशिक

मेहरूण तलावावरील पक्के अतिक्रमण हटविले

CD
NSK26H29856 जळगाव : मेहरुण तलाव येथील गणेश घाटाची पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने. --- मेहरुण तलावावरील पक्के अतिक्रमण हटविले आयुक्तांच्या पाहणीनंतर तत्काळ कारवाई; विसर्जन मार्ग मोकळा, स्वच्छतेलाही वेग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण तलाव परिसरातील तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तलावाला भेट दिली. पाहणीदरम्यान गणेश घाट तसेच मुख्य मंदिर परिसरातील विसर्जन मार्गावर पक्के अतिक्रमण आढळून आले. त्यामुळे आयुक्तांनी तत्काळ अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर महापालिकेच्या पथकाने कारवाई करीत बांधकाम हटवून विसर्जनाचा मार्ग मोकळा केला. पाहणीवेळी गणेश घाट परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचल्याचेही आयुक्तांच्या निदर्शनास आले. गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असताना घाट परिसरात अस्वच्छता आढळल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शहर अभियंता आणि प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने घटनास्थळी बोलावून परिसराची स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करून त्यानुसार कामाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. चौकट उपाययोजना करण्यावर भर दरम्यान, मंदिराजवळील रस्त्यावर पक्के बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आल्याचे आढळल्यानंतर आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला कारवाईचे आदेश दिले. अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी पोहोचून संबंधित बांधकाम हटविले. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मार्गातील अडथळा दूर झाला. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर तलाव परिसरात स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि विसर्जन मार्गाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT