नाशिक

जगन्नाथपुरीपासून केशवनाथेश्वर मंदिरापर्यंत धार्मिक देखाव्यांची पर्वणी

CD
मे फिचर टुडे ४ -- गणेशमूर्तीचा फोटो लहान व आरास फोटो मोठा घेतला तरी चालेल. -- NSK26H29862 : श्री गर्जना गणेश मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती. NSK26H29863 : श्री गर्जना गणेश मंडळाचे आकर्षक मंदिर. -- NSK26H29864 : पंचरत्न गणेश मंडळाची आकर्षक मूर्ती. NSK26H29865 : पंचरत्न गणेश मंडळाचा सामाजिक संदेश देणारी आरास. --- NSK26H29866 : नवीपेठ गणेश मित्रमंडळाची विलोभनीय मूर्ती. NSK26H29867 : नवीपेठ गणेश मित्रमंडळाची आरास. --- जगन्नाथपुरी ते केशवनाथेश्वर मंदिरापर्यंत देखाव्यांची पर्वणी पंचरत्नच्या देखाव्यातून मोबाईलच्या अतिवापरावर प्रबोधन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशमंडळांमध्ये आकर्षक देखावे साकारण्याची लगबग सुरू आहे. धार्मिक परंपरा, ऐतिहासिक वास्तू तसेच सामाजिक प्रश्नांना हात घालत मंडळांनी भाविकांसाठी विविध विषय मांडले आहेत. जिल्हापेठ युवक गणेश मित्रमंडळाने जगन्नाथपुरी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. पंचरत्न गणेश मंडळाने मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कुटुंबातील कमी होत चाललेल्या संवादावर भाष्य केले आहे. तर श्री गर्जना गणेश मित्रमंडळाने कर्नाटकातील प्राचीन केशवनाथेश्वर मंदिराची हुबेहूब आरास उभारली असून भाविकांचे आकर्षण ठरत आहे. जगन्नाथपुरीचा भव्य देखावा नवीपेठ गणेश मित्रमंडळाचा यंदाचा ३४ वा गणेशोत्सव आहे. यानिमित्त मंडळाने जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या आकर्षक मूर्ती तसेच मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. भगवान जगन्नाथ यांच्या जन्मापासूनची माहितीही देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. हा देखावा साकारण्यासाठी बंगालमधील सुमारे २० ते २५ कारागिरांनी सलग १५ दिवस मेहनत घेतली. दरवर्षी वेगळ्या विषयावरील देखावा साकारण्याची परंपरा मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण खडके, उपाध्यक्ष पूर्वेश काळे व सचिव गणेश कापडे यांनी याबाबत माहिती दिली. मोबाईलचा कारावास की कुटुंबाचा सहवास नवीपेठेतील पंचरत्न गणेश मंडळाने यंदा सामाजिक विषयाला प्राधान्य दिले आहे. मंडळाच्या ३७ व्या गणेशोत्सवानिमित्त ‘काय हवंय... कुटुंबाचा सहवास की मोबाईलचा कारावास?’ या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कुटुंबातील प्रत्यक्ष संवाद कसा कमी होत चालला आहे, याचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. पूर्वी सण-उत्सवांच्या काळात नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या प्रत्यक्ष भेटीगाठी होत असत. आता मात्र मोबाईलवर संदेश पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी माणसांमधील संवाद आणि जवळीक कमी होत असल्याचा संदेश या देखाव्यातून देण्यात आला आहे. गुहेतील केशवनाथेश्वर मंदिराची प्रतिकृती नवीपेठेतील श्री गर्जना गणेश मित्रमंडळाने यंदा धार्मिक पर्यटन आणि प्राचीन वास्तुकलेचा परिचय करून देणारा देखावा साकारला आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापुरा परिसरातील मुदूर (केराडी) गावातील प्राचीन केशवनाथेश्वर मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. गुहेमध्ये असलेल्या महादेव मंदिराची रचना बारकाईने साकारण्यात आली असून, मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण पिंडीची रचनाही देखाव्यात दाखविण्यात आली आहे. पाण्यातील पिंड आणि बाहेरील दुसरी पिंड ही या मंदिराची विशेष आकर्षणे असल्याने त्याची हुबेहुब मांडणी करण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मंडळाने गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. विसर्जनासाठी लहान शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर केला जात असल्याचे मंडळाचे अध्यक्ष रिकू चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT