नाशिक

जयहिंदच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H29859 धुळे : गेट- टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आलेले जयहिंद हायस्कूलचे माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी. --- ‘जयहिंद’चे माजी विद्यार्थी ४४ वर्षांनी एकत्र --- गेट-टुगेदरच्या निमित्ताने शालेय आठवणींना उजाळा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : शहरातील जयहिंद हायस्कूलच्या १९८१-८२ दहावी बॅचचे गेट टूगेदर नुकतेच एमआयडीसी परिसरातील हॉटेल खोडीयार काठीयावाड येथे झाले. यानिमित्ताने शालेय जीवनानंतर नोकरी व्यवसायनिमित्ताने दुरावलेले सवंगडी तब्बल ४४ वर्षांनी आणि वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर पुन्हा एकत्र आले. या गेट-टुगेदरसाठी सुमती मोराणकर (हर्षदा पाठक), सुरेश बंग, अनिल राऊत यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर मित्रमैत्रिणींशी संपर्क साधून एकत्र येण्याचे आवाहन केले. मित्रांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिली. जवळपास बेचाळीस मित्र-मैत्रिणी या गेट टूगेदर मध्ये सहभागी झाले. केवळ धुळ्यातीलच नाही तर जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सवंगडी यानिमित्त एकत्र आले. सर्व मित्र- मैत्रिणींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. परिचय सत्रात सर्वांनी शालेय जीवनानंतरचा नोकरी, व्यवसायाची वाटचाल व पारिवारिक स्थिती मनोगतातून मांडली. डॉ. मनीष जाखेटे, डॉ. अरुण मोरे, डॉ. प्रशांत देवरे, ॲड. मनोज देवरे, मंगला पाटील आदींनी मनोगतातून त्यांचा शालेय जीवनानंतरचा प्रवास कथन केला. दुपारच्या सत्रात स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व ग्रुप फोटोसेशननंतर सर्वांनी पुन्हा भेटण्याच्या अपेक्षेसह एकमेकांचा निरोप घेतला. ---

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT