नाशिक

शहरात पोलिसांचा कडेकोट फौजफाटा

CD
शहरात पोलिसांचा कडेकोट फौजफाटा नाशिक, ता. १७ : सोमवारी (ता. १४) वाजतगाजत श्री गणरायाचे आगमन झाले. श्रींच्या आगमनामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळांमध्येही उत्साह संचारला असून, आरास व देखाव्यांची कामे जोमाने केली जात आहेत. दरम्यान, येत्या शनिवार- रविवार सुट्टी असल्याने भाविकांची रात्री उशिरापर्यंत आरास व देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या देखावे पाहण्याच्या आनंदावर पावसाचे सावट असणार आहे. तर, दुसरीकडे गणेशोत्सवासाठीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून सायंकाळी वाहतूक मार्गात बदलही करण्यात आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून जादा पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या सहावा - सातवा दिवस शनिवार-रविवार आहे. याच दिवशी औद्योगिक वसाहतीला सुटी असते. शासकीय कार्यालयासह काही खासगी आस्थापनांनाही सुट्टी असते. त्यामुळे सुट्टीची संधी साधून शनिवारी सायंकाळनंतर भाविक गणपतींचे देखावे व आरास पाहण्यासाठी घराबाहेर मोठ्या संख्येने पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेत गर्दी होण्याची दाट शक्यता गृहित धरून पोलिस यंत्रणेकडून जादा बंदोबस्ताचे नियोजनही करण्यात आलेले आहे. गणेशोत्सव काळात शहराच्या मुख्य भागात होणाऱ्या गर्दीची शक्यता गृहित धरून शहर पोलीस वाहतूक शाखेने काही रस्त्यांवर सायंकाळी ६ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहर बसेस, अवजड वाहने, चारचाकी वाहनांसह वाहतुकीला प्रवेश बंदी केली आहे. यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेले आहे. विशेषतः रविवार कारंजा, अशोकस्तंभ, शालिमार, भालेकर मैदान या परिसरातून वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मदतीला सुमारे दीड हजार होमगार्ड, राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, शीघ्रकृती दलाच्या दोन तुकड्यात दाखल झाल्या आहेत. तर, परजिल्ह्यातील सुमारे ५०० पोलिस अंमलदारांचा फौजफाटा शहरात दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT