नाशिक

भारतीय मजदूर संघ- निवेदन

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H29894 धुळे : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र कामगारांना वाढीव कर्ज, प्रशिक्षण द्या या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांना देतांना भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी. --- कामगारांना वाढीव कर्ज, प्रशिक्षण द्या --- भारतीय मजदूर संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत पात्र कामगारांना दोन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करावे, कामगारांना प्रशिक्षण द्यावे आदी मागण्या भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा शाखेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले. भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशभर १७ सप्टेंबर हा कामगार दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधत असंघटित कामगार विश्वकर्मा संकल्प परिवाराच्या विविध मागण्या भारतीय मजदूर संघांने केल्या आहेत. यात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत ज्या कामगारांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात आले. त्यापैकी अनेक कामगारांनी कर्जाची परतफेड केली असल्याने पात्र कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच ज्या कामगारांचे प्रशिक्षण अद्याप झालेले नाही, त्यांच्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षण वर्ग सुरू करावा, विश्वकर्मा योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या विविध घटकांना योजनेचा लाभ तातडीने मिळावा तसेच संबंधित घटकांचे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या. भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सोनवणे, कार्याध्यक्ष सुनिल देवरे, घरेलू कामगार विभागाच्या उपाध्यक्षा संगीता चौधरी, नरेंद्र मोरे, सचिव गुलाबराव भामरे, अनुजा देशपांडे आदींनी मागण्यांचे निवेदन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे यांना दिले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT