त्र्यंबक रस्ता १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणार
शेखर सिंह : सिंहस्थ कामांची त्रिस्तरीय तपासणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १७ : सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे प्रगतिपथावर सुरु असून नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसर खुला केला जाईल, असे स्पष्ट करताना सिंहस्थ कामांच्या दर्जा व गुणवत्तेसाठी त्रिस्तरीय तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात गुुरुवारी (ता.१७) आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी सिंह बोलत होेते. ते म्हणाले, ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसर खुला करण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने संबंधित कामांना गती देण्यात आली आहे. रामतीर्थ परिसरात वस्त्रांतर गृह व सार्वजनिक स्वच्छतागृहाचे काम सध्या प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. त्याचवेळी रामकाल पथाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल, असे सिंह यांनी स्पष्ट केले.
आयुक्त सिंह पुढे म्हणाले, नाशिक रिंगरोड प्रकल्पातील भू-संपादन आणि इतर तांत्रिक बाबी जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने सोडविल्या आहेत. प्रकल्पाच्या सातही पॅकेजमध्ये कामाचा शुभारंभ झाला आहे. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये सीसीटीव्हीचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण केले जाणार असून त्र्यंबकेश्वरमधील सीसीटीव्हीचे काम पूर्णत्वास गेल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील गर्दीचा अंदाज बघता नाशिक-त्र्यंबक मार्गावर पाच ते सहा ठिकाणी वाहनतळ प्रस्तावित करण्यात आले आहे. तपोवनात साधुग्राम भू-संपादन व भाडेतत्त्वावरील जागेचा प्रश्नही जवळपास संपुष्टात आल्याचे माहिती सिंह यांनी दिली.
---
४२ गणेश मंडळांचे अर्ज
‘सिंहस्थ महाकुंभ गणेश मंडळ स्पर्धेत गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गुरुवारी (ता.१७) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४२ मंडळांनी स्पर्धेसाठी अर्ज दाखल केल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी नऊ सदस्यीय तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे हे समितीचे अध्यक्ष आहेत. स्पर्धेत ५ प्रमुख प्रवर्ग असून प्रत्येक प्रवर्गातील विजेत्या मंडळाला १ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण आणि विशेष संकल्पनेसाठी दोन लाखांचे पारितोषिक असेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.