नाशिक

त्रिमुर्तीनगर मंडळाने साकारला नाशिकच्या खड्ड्यांचा देखावा

CD
फोटो -NSK26H29904 पंचवटी : येथील त्रिमूर्तीनगर मित्र मंडळाने साकारलेला खड्ड्यांचा देखावा. त्रिमूर्तीनगर मंडळाने साकारला नाशिकच्या खड्ड्यांचा देखावा सकाळ वृत्तसेवा पंचवटी, ता. १७ : पंचवटी येथील हिरावाडी रोड परिसरात त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश मित्र मंडळाने यंदा नाशिकचे खड्डे व खड्ड्यांमुळे गेलेले बळी यावर लक्ष वेधणारा देखावा साकारला आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाद्वारे समाजप्रबोधन करायला सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेला गणेशोत्सवात समाजात प्रबोधन करण्यासाठी देखाव्याची मदत घेतली जाते. असाच समाजप्रबोधनपर देखावा हिरावाडी रोड येथील त्रिमूर्ती नगर कला, क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ व मदत फाउंडेशनने साकारला आहे. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेले अपघात, मृत्युमुखी पडलेले नागरिक, नाशिकमधील वृक्षतोडीमुळे होत असलेले प्रदूषण व नाशिकमधील रस्त्यावरील वाहतूक कोंडी यासारख्या विविध प्रश्नांचा जाब गणपती बाप्पा या देखाव्यात विचारत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत हे काम होईल की नाही, असा नाशिककरांना पडलेला प्रश्न आता गणपती बाप्पा देखील विचारत असलेला देखावा त्रिमूर्ती नगर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी साकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Hadapsar Railway: रेल्वे प्रवाशांनो, लक्ष द्या! पुणे-हडपसर मार्गावर १९ सप्टेंबरपासून मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

TET Rules: शिक्षकांसाठी मोठी अपडेट! TETच्या नियमांचा केंद्राकडून फेरआढावा; सेवेत असलेल्या शिक्षकांच्या अडचणींवरही होणार चर्चा

Beed Rain: परळी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी; सिरसाळ्यात ११२ मिमी, खरिपाला आधार अन् रब्बीच्या पेरणीच्या आशा पल्लवित

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

हार्दिक पांड्या १० षटकं फेकू शतक नाही! गौतम गंभीरचं ऑल राऊंडरच्या भविष्याबाबत मोठं विधान; म्हणाला, नितीश कुमार रेड्डी...

SCROLL FOR NEXT