धुळे ः टुडे १ साठी, मेन
--
लोगो छायाचित्र ः समर्पक घेणे
--
खत विक्री आराखडा प्रणाली २५ पासून लागू
-
कृषी विभाग : शेतकऱ्यांना गरजेनुसार मिळणार खत; काळाबाजाराला आळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : जिल्ह्यात आगामी २५ सप्टेंबरपासून रासायनिक खतांच्या विक्रीसाठी खत विक्री आराखडा (एफएफएस) ही अभिनव ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात येत आहे. या पारदर्शक प्रणालीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची आणि क्षेत्राची प्रत्यक्ष गरज लक्षात घेऊन आवश्यक तेवढाच खतसाठा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तसेच, खतांची अनधिकृत साठवणूक, कृत्रिम टंचाई आणि काळाबाजाराला यामुळे मोठा आळा बसणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना या नव्या प्रणालीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत यांनी केले.
--
कृषि अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही प्रणाली सोपी आणि ‘युजर फ्रेंडली’ आहे. यात शेतकऱ्यांनी प्रथमतः गुगल प्ले स्टोअरवरून खत विक्री आराखडा (एफएफएस) ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करावे. नंतर मोबाईल नंबर किंवा शेतकरी ओळख क्रमांकाच्या साहाय्याने ॲपमध्ये लॉगिन करावे. प्रणालीमध्ये दिसणाऱ्या आपल्या शेतजमिनींपैकी ज्या जमिनीसाठी खताची आवश्यकता आहे, तिची निवड करावी. पिकाची योग्य माहिती आणि आवश्यक खताची मागणी नोंदवावी. त्यानंतर उपलब्ध साठ्यानुसार योग्य खत व नजीकचा विक्रेता निवडता येईल.
--
७२ तासांची वैधता
खताची ऑनलाइन मागणी नोंदवल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एक क्यूआर कोड तयार होईल. हा क्यूआर कोड संबंधित अधिकृत खत विक्रेत्याला दाखवून निर्धारित खत खरेदी करता येईल. हा क्यूआर कोड ७२ तासांसाठी (३ दिवस) वैध राहील. ठराविक मुदतीत खत खरेदी न केल्यास कोडची वैधता संपुष्टात येईल आणि शेतकऱ्याला पुन्हा नोंदणी करून नव्याने मागणी नोंदवावी लागेल.
--
नव्या प्रणालीचे फायदे
नव्या प्रणालीचे फायदे असे : मुख्य खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने किंवा खते खरेदी करण्याची सक्ती करण्याच्या (जोडविक्री) प्रकाराला पायबंद बसेल. पिक व क्षेत्रनिहाय अचूक खत वितरण होईल. अनधिकृत साठवणूक आणि कृत्रिम टंचाईवर नियंत्रण राहण्यास मदत होईल. शेतीसाठी अनुदानित दरात मिळणाऱ्या युरियाचा औद्योगिक वापर प्रभावीपणे रोखता येईल. बनावट वा दुबार खत विक्रीला नियंत्रण बसेल. तसेच शेतकऱ्यांना घरबसल्या खत उपलब्धतेची माहिती मिळणार असल्याने दुकानांसमोर रांगा लावण्याची कटकट मिटेल.
--
शेतकऱ्यांसाठी सल्ला
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबरपासून रासायनिक खतांची खरेदी करताना खत विक्री आराखडा प्रणालीचाच वापर करावा. दरम्यान, खतासोबत इतर वस्तू किंवा अतिरिक्त खते घेण्याची सक्ती केल्यास, निर्धारित दरापेक्षा जादा दर आकारल्यास, काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा खताच्या रंग व गंधामध्ये तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी न घाबरता तत्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
--
१४-१
...चौकट...
१४-१
जिल्ह्यातील खतसाठ्याची स्थिती
जिल्ह्यात मुख्यत्वे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मका आणि इतर पिकांखालील मोठ्या क्षेत्रासाठी रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. कृषी विभागाचे नियोजन आणि अहवालानुसार जिल्ह्यासाठी खरीप हंगामात सर्वसाधारणपणे १ लाख १२ हजार ते १ लाख १३ हजार टन खतांचे एकूण आवंटन (मागणीनुसार मंजूर साठा) मंजूर केले जाते. यात प्रामुख्याने युरिया सुमारे ५१ हजार टन, डीएपी सुमारे ६ हजार ४०० ते ६ हजार ५०० टन, एमओपी सुमारे ४ हजार ९०० टन, उर्वरित साठा हा एसएसपी आणि विविध संयुक्त/मिश्र खतांचा असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.