धुळे ः टुडे १ साठी
--
पेजीनेशनला सूचना ः फोटोचा क्रम व फोटो ओळीचा क्रम चुकवू नये...उलटसुलट करू नये...जसे दिले तसेच पानावर घ्यावे...भगवान शिव फोटो कापू नये.
--
फोटो क्रमांक ः 29913 व 29914
धुळे : गणेशोत्सवानिमित्त साक्री रोडवरील देखावा पाहण्यासाठी झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात भगवान शिव सजीव देखावा.
--
शिव- पार्वती विवाहाचा थ्रीडी देखावा
-
धुळ्यात आकर्षण : पद्मनाभनगरातील गणराज प्रतिष्ठानचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : गणेशोत्सवानिमित्त साक्री रोडवरील पद्मनाभनगरातील गणराज प्रतिष्ठानतर्फे शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात आला आहे. थ्रीडी इफेक्टमुळे भगवान शिव व माता पार्वती प्रत्यक्ष अवतरल्याचा भास होत असल्याने देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. त्यामुळे महिला भाविकांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते राहुल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात गणराज प्रतिष्ठानचा यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव दुसऱ्या वर्षी साजरा होत आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष छोटू खरात, कार्याध्यक्ष अनिल थोरात, सहकार्याध्यक्ष रविराज चव्हाण, बंटी सोनवणे, पुष्पक अग्रवाल, दर्शन बोरसे, भावेश अग्रवाल, प्रथमेश पाटील, ज्ञानदीप थोरात, उज्ज्वल थोरात, दिनेश मोरे, जुनैद शेख, योगीराज खोंडे, कल्पेश दशपुते, सागर अग्रवाल, योगेश मराठे, यश वाघ तसेच नगरसेविका प्रतिभा अनिल पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे.
रोज सायंकाळी सातपासून सजीव देखाव्याला सुरुवात होत असून, तीन वेळा तो सादर केला जात आहे. थ्रीडी तंत्रज्ञानामुळे विवाह सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव येत असल्याची भावना भाविक व्यक्त करीत आहेत. महिला भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, सुरक्षेची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प करत या प्रतिष्ठानने प्रभागात आतापर्यंत एक हजार १०० वृक्षांची लागवड केली असून त्यांच्या देखभालीवरही भर दिला जात आहे. गणेशोत्सवानिमित्त सिहोर येथील रुद्राक्षांचे वाटपही करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष छोटू खरात यांनी सांगितले. भाविकांनी शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.