नाशिक

जोपूळ आश्रमशाळेला अचानक भेट; असुविधा बघताच मान्यता रद्दच्या सूचना

CD
फोटो : 29915- दिंडोरी : जोपूळ आश्रमशाळेची गुरवारी पाहणी करताना मंत्री प्रा.अशोक उईके, प्रभारी आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प संचालक अर्पिता ठुबे. गोठ्यासारखे स्वयंपाकगृह, विद्यार्थी जमिनीवर जोपूळ आश्रमशाळा बंद करण्याचे मंत्री उईके यांचे आदेश सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : आश्रमशाळांतील गैरसोयींवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी (ता.१७) सायंकाळी जोपूळ (ता. दिंडोरी) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेला अचानक भेट दिली. शाळेच्या स्वयंपाकगृहाची गुरांच्या गोठ्यासारखी झालेली दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी साधे पलंगही नसल्याचे पाहून मंत्री उईके संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांना शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश देत विद्यार्थ्यांना अन्य शाळेत दाखल करण्याच्या सूचना दिल्या. दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर असलेल्या उईके यांनी बुधवारी बोपेगाव व माणी येथील आश्रमशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्याची प्रचिती दुसऱ्याच दिवशी जोपूळ येथे आली. शाळेच्या स्वयंपाकगृहाची दुरवस्था पाहून त्यांनी अधीक्षकांना थेट जाब विचारला. शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना पलंगच नसल्याने ते जमिनीवर झोपत असल्याचे समोर आले. यावर मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ऑगस्टमध्ये याच शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्याध्यापक, अधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. आदिवासी संघटनेचे प्रभाकर फसाळे व विकी मुंजे यांनी विद्यार्थ्याच्या मृतदेहाची झालेली हेळसांड मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी प्रभारी आदिवासी विकास आयुक्त गोपीचंद कदम, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प संचालक अर्पिता ठुबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

Elderly Doctor Cheated: वृद्ध महिलेच्या देखभालीच्या बहाण्याने दोन कोटींची फसवणूक

Latest Marathi News Update : महाराष्ट्रासह देशभरातील आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT