NSK26H29921
जळगाव : दीक्षितवाडी मित्रमंडळाने साकारलेली ‘मराठा साम्राज्य.. अटक ते कटक’ या ऐतिहासिक देखाव्याची आरास.
----------
‘मराठा साम्राज्य-अटक ते कटक’
देखावा ठरतोय आकर्षणाचे केंद्र
उपशीर्षक
दीक्षितवाडी मित्रमंडळाची वैशिष्ट्यपूर्ण आरास
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : स्व. नरेंद्रअण्णा पाटील प्रतिष्ठान, जळगाव संचालित दीक्षितवाडी मित्र मंडळ ‘जळगावचा विघ्नहर्ता’ यांनी यंदा भक्ती, इतिहास आणि कलात्मकतेचा संगम साधत मराठा साम्राज्याच्या विस्ताराची भव्य आरास साकारली आहे. महाराजांच्या बैठकीच्या स्वरूपातील आकर्षक गणेशमूर्ती हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
मंडळाच्या वतीने यंदा ‘मराठा साम्राज्य- अटक ते कटक’ हा भव्य ऐतिहासिक शिवकालीन देखावाही साकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणेतून पुढे विस्तारलेल्या मराठा साम्राज्याचा पराक्रम, शौर्य आणि ऐतिहासिक वैभवाची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून नागरिकांना अनुभवता येणार आहे.
या देखाव्यामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार, शौर्य, पराक्रम तसेच इतिहासातील महत्त्वपूर्ण प्रसंग कलात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. विशेष प्रकाशयोजना, आकर्षक सजावट आणि बारकाईने केलेली कलाकुसर यामुळे हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
चौकट
देखावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम
हा ऐतिहासिक देखावा यशस्वी करण्यासाठी राजा शिवछत्रपती परिवाराचे संतोष पाटील तसेच मंडळाचे योगेश निंबाळकर, सुनय पाटील, मयूर चौधरी, ओम चौधरी, कल्पेश चौधरी, व्यंकटेश उपाध्याय, प्रशांत चौधरी, विकास पाटील, विजय माळी आणि सचिन शर्मा यांनी परिश्रम घेतले.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.